Join us  

BPO तून करिअरची सुरुवात, वडिलांकडून मिळाले 2500000000 किंमतीचे शेअर्स गिफ्ट, कोण आहेत तारिक प्रेमजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 1:17 PM

अझीम प्रेमजी हे उद्योगजगतातील नावाजलेलं व्यक्तिमत्व. सर्वाधिक दानशूर व्यक्तींच्या यादीत अझीम प्रेमजींचं नाव अव्वल स्थानावर येतं. भारतील श्रीमंत बिझनेसमॅन म्हणून त्यांची जगभर ख्याती आहे. वेगवेगळ्या माध्यमातून ते चर्चेत असतात. 

Success Story: भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून अझीम प्रेमजी यांची ओळख करुन दिली जाते.  आपल्या व्यवसायिक दुरदृष्टीच्या जोरावर त्यांनी उद्योग क्षेत्रात भलं-मोठं वैभव उभं केलंय. त्यांच्या नेत्तृत्वाखाली विप्रो कंपनी खऱ्या अर्थानं नावारूपाला आली.  अतिशय खडतर परिस्थितीत अझीम प्रेमजी यांनी आपल्या वडिलांचा तेल-साबणाचा व्यवसाय वाढवला आणि पुढे जाऊन स्वतःची IT कंपनी उभारली. सध्याच्या घडीला या कंपनीचं मार्केट कॅप  २,७३,०० कोटींपेक्षा अधिक असल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, अझीम प्रेमजी नेहमीच समाजमाध्यमांवर चर्चेत असतात. परंतु, त्यांचा धाकटा मुलगा तारिक प्रेमजी यांच्याबद्दल लोकांना फारशी  माहिती नाही. अझीम प्रेमजी फाउंडेशन मार्फत दिलेल्या देणग्यांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.

वडिलांकडून मिळाले २५० कोटींचे शेअर्स केले गिफ्ट : अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे  तारिक प्रेमजी यांच्याबद्दल अनेकांना माहिती नसेल. विप्रो एंटरप्रायझेसचे नॉन एक्झिक्युटीव्हचे संचालक म्हणून तारिक प्रेमजींची ओळख आहे. 

तारिक प्रेमजींना त्यांचे वडील अझीम प्रेमजी यांच्याकडून २५० कोटी रुपयांची भेट मिळाल्यामुळे ते चर्चेत आले. अझीम प्रेमजी यांनी ५१,१५,०९० किंमतीचे शेअर्स त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये मोठा मुलगा रिशाद आणि तारिक यांना गिफ्ट केले. रिशाद सध्या विप्रोचे अध्यक्ष आहेत तर तारिक अझीम प्रेमजी फाउंडेशनमध्ये काम पाहतात.

बीपीओमधून केली करिअरची सुरूवात : बंगळूरू युनिवर्सिटीच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं. हल्ली तारिक प्रेमजी हे आता प्रेमजी इन्व्हेस्टच्या गुंतवणूक समितीचा कार्यभार सांभाळतात. ही गुंतवणूक समिती ५ अब्ज डॉलरचा निधी जमा करते.

विप्रोमध्ये मोठी जबाबदारी : २०१६ पासून तारिक प्रेमजींवर विप्रो कंपनीच्या दोन महत्वाच्या संस्थांचा कार्यभार त्यांच्या खांद्यावर आला. यामध्ये अजीम प्रेमजी फिलान्थ्रोपिक इनिशिएटिव्ह आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनचा समावेश आहे. 

तारिक यांच्याकडे अझीम प्रेमजी एंडॉवमेंट फंडाचे उपाध्यक्षपदाची धुरा देखीस सोपवण्यात आली आहे . या फंडाची उभारणी ही अझीम प्रेमजींच्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी केली होती. तारिक यांनी या फंडातील वाढीव गुंतवणूकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नॉन एक्झिक्युटीव्ह संचालक म्हणून नियुक्ती : तारिक प्रेमजी  हे विप्रो एंटरप्रायझेसचे नॉन एक्झिक्युटीव्हचे संचालक आहेत.त्यांच्या नियंत्रणाखाली विप्रो कंझ्युमर केअर आणि लाइटिंग, तसंच विप्रो इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग या दोन कंपन्या चालतात. ही कंपनी भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असून हिचे मार्केट कॅप २ लाख ७३हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.

टॅग्स :व्यवसायअझिम प्रेमजीप्रेरणादायक गोष्टी