Join us  

एका निर्णयाने आयुष्यचं बदललं, अमेरिकेतील नोकरीवर पाणी सोडत मायदेशी परतले, उभी केली १७०० कोटींची कंपनी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 3:17 PM

आयुष्यात वेळीच योग्य तो निर्णय घेतला तर आपसुकच यश तुमचंच असतं. पण काहीजण असेही असतात जे आपल्या निर्णयावर ठाम राहून ध्येयाचा पाठलाग करत यशाचं शिखर गाठतात. 

Success Story : अमेरिकेतील प्रतिष्ठीत कंपनीतील नोकरीवर पाणी सोडून हा उद्योजक भारतात परतला. नेमकं त्यांनी असं का केलं? त्यांच्या या निर्णयामागं काय कारण होतं, जाणून घेऊया सविस्तर...

कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना त्यांनी अचानक टोकाचा निर्णय घेतला आणि ते आपल्या मायदेशी परतले.  हे उद्योजक दुसरे तिसरे कोणी नसून इंडियामार्टचे संस्थापक दिनेश अग्रवाल आहेत. साधारणत: १९९५ ची गोष्ट असेल. तत्कालीन भारताचे पंतप्रंधान पी वी नरसिम्हा यांनी भारतात इंटरनेट लॉन्चिंगची घोषणा केली. मग काय क्षणाचाही विलंब न करता दिनेश अग्रवाल यांनी अमेरिकेतील कंपनीत राजीनामा दिला आणि त्यांनी भारताकडे धाव घेतली. भारतातील  इंटरनेट क्षेत्रातील क्रांती त्यांच्यासाठी एक नवीन संधी बनून आली, ज्याचा त्यांनी पूरेपूर फायदा करून घेतला. याच दरम्यान त्यांनी इंडियामार्टची स्थापना केली. 

जन्म, शैक्षणिक प्रवास- 

दिनेश अग्रवाल यांचा जन्म १० फ्रेब्रुवारी १९६९ मध्ये  कानपुरमध्ये झाला. त्यांचं शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कानपूर येथील हरकोर्ट बटलर टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी कॉम्यूटर सायन्स शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं. या प्रवासात प्रचंड अनुभव त्यांच्या गाठीशी होता. सीएमसी कंपनीत दिनेश अग्रवाल यांनी पहिला जॉब केला. कालांतराने या कंपनीला टीसीएसने विकत घेतलं. सीएमसी मध्ये काम करत असताना भारतातील पहिली रेल्वे आरक्षण प्रणाली विकसित केल्याचं सांगण्यात येतं. 

सीएमसीमधून बाहेर पडल्यानंतर ते सॅम पित्रोदा यांच्या टीममध्ये सामील झाले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्ससाठी काम करतानाच त्यांनी  डिजिटल टेलिफोन एक्सचेंजसाठी काम केलं. जवळपास १९९२ मध्ये ते आघाडीच्या टेक कंपनी एचसीएलमध्ये रुजू झाले. त्यानंतर अमेरिकेत इंटरनेटचा वाढता वापर त्यांच्या लक्षात आला आणि ते भारतात परतले. 

अशी उभारली कंपनी- 

ऑनलाईन  तसेच ऑफलाईन  हायब्रिड मॉडेलपासून प्रभवित होऊन त्यांनी या कंपनीची उभारणी केली. त्यानंतर इंडियामार्टचा विस्तार झपाट्याने होऊ लागला. भारतात परतल्यानंतर त्यांना भारतीय मार्केटमधील काही त्रुटी जाणवल्या. त्यातुनच त्यांना भारतीय निर्यातदारांसाठी वेबसाईट बनवण्याची कल्पना सुचली. त्यांना निर्यातदार आणि पुरवठादारांसाठी एक ऑनलाईन डायरेक्टरी चालू करण्याची मनोमन इच्छा होती. पण भारत सरकारने त्याला विरोध दर्शवला. तरीही हार न मानता दिनेश अग्रवाल यांनी फ्री-लिस्टिंग फॉर्मच्या माध्यमातून निर्यातदारांशी संपर्क साधला. या माध्यमातून वेगवेगळी माहिती  मिळवत त्यांनी विक्रेत्यांची संपूर्ण माहिती गोळा केली. यातूनच इंडियामार्टचा जन्म झाला. इंडियामार्टची सुरुवातीची टॅगलाइन अशी होती –'' The Global Gateway to the Indian Marketplace'' अग्रवाल यांनी अवघ्या ४०,००० रुपयांच्या गुंतवणुकीने ही कंपनी सुरू केली होती. 

एकूण संपत्ती- 

आर्थिक संकटाने पिचून निघालेल्या भारतासाठी इंडियामार्ट वरदान ठरलं. भारताला  B2B चा राजा बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. २००७-०८ मध्ये अमेरिकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मंदीचा परिणाम जगभर जाणवू लागला होता. निर्यातीचे कामही मंदावले. या काळात, दिनेश आणि त्याचा चुलत भाऊ ब्रिजेश यांनी इंडियामार्टचे लक्ष भारतातील B2B बाजारपेठेच्या निर्यातीकडे वळवले. यामुळे घाऊक आणि किरकोळ विक्रेते एकाच व्यासपीठावर आले. व्यवसाय झपाट्याने वाढू लागले. कंपनीने २०१० मध्ये ५२ आठवड्यात ५२ कार्यालये उघडण्याचा विक्रम केला. रिपोर्टनुसार,  दिनेश अग्रवाल यांची एकूण संपत्ती ५,००० कोटींहून अधिक आहे. ट्रेंडलाइननुसार, दिनेश अग्रवाल यांच्याकडे ३१ मार्च २०२४ पर्यंत ९ कंपन्यांमध्ये भागीदारी असल्याचं सांगण्यात येतं.

टॅग्स :व्यवसायप्रेरणादायक गोष्टी