नवी दिल्ली- शेतीत नवनवीन प्रयोग केल्यास उत्पन्न हे मिळतंच मिळतं, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे. बिहारमधल्या मधुबनी जिल्ह्यात राहणारा शेतकरी अशोक कुमारनंही शेतीत वेगळाच प्रयोग केला आहे. अशोक पहिल्यांदा फक्त माशांच्या बीजोत्पादनाची शेती करायचे. परंतु नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी शेतीचं महत्त्व समजून घेतलं आहे. या मत्स्यशेतीतून अशोक कुमार वर्षाला 50 लाख रुपये कमावतायत. त्यातील 25 लाख रुपये खर्च होतो आणि उर्वरित 25 लाख वाचतात. त्याच्या या अभिनव प्रयोगामुळे राज्यानंही त्यांना बऱ्याचदा सन्मानित केलं आहे. नव्या जमान्याची शेती- एकत्रित शेती प्रणाली ही एक अशी प्रणाली आहे, ज्यात शेती उत्पादन, मधमाशी पालन, भाज्यांचं उत्पादन, मत्स्यपालन यांचा समावेश आहे. या प्रणाली एक-दुसऱ्यांची पूरक असतात. असा प्रयोग केल्यास शेतकरी आपलं उत्पन्न वाढवू शकतो. तसेच त्याचा फायदाही दुप्पट होऊ शकतो.
शेतीतून 'तो' कमावतो वर्षाला 50 लाख रुपये, आपल्यालाही पैसा कमावण्याची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 09:55 IST