Join us

Business Idea: गल्ली गल्लीत चालेल असा व्यवसाय; 12 रुपयांत सामान घ्या ५० रुपयांत विका, काय म्हणता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:35 IST

मेहनत घेतली आणि वाढला तर तुम्ही हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावरही करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा छोट्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सुरुवातीची गुंतवणूक फक्त 5000 रुपये असेल परंतू कमाई मोठी असू शकेल.

नोकरी करून हाती काही लागत नाहीय, किंवा अतिरिक्त उत्पन्न हवेय, त्याच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला आज एक व्यवसाय सांगणार आहोत. एक असा व्यवसाय ज्या वस्तूंची प्रत्येकाला गरज असते. तुम्ही पाच हजारांत छोट्याशा टपरीवजा जागेत हा व्यवसाय सुरु करू शकता. महत्वाचे म्हणजे १२ रुपयांची वस्तू तुम्ही ५०, १०० रुपयांना विकू शकता. तसेच गुंतवणूकही जास्त नाही तर ५००० हजारांच्या आसपास. काय म्हणता...

मेहनत घेतली आणि वाढला तर तुम्ही हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावरही करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा छोट्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये सुरुवातीची गुंतवणूक फक्त 5000 रुपये असेल परंतू कमाई मोठी असू शकेल. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, काहीकडे तर एकापेक्षा जास्त मोबाईल असतात. मोबाईल वापरकर्त्यांचा आणि विक्रीचा आकडा पाहिला तर मोबाईल अॅक्सेसरीजचा मोठा व्यापार होणार आहे. 

कोणाला स्क्रीन गार्ड हवा, कोणाला मोबाईल कव्हर, कोणाला हेडफोन तर कोणाला चार्जर. दुरुस्तीची सेवा दिली तर सोन्याहून पिवळे. आजकाल तर नवा मोबाईल घेताना फक्त चार्जरच येतो. अॅपलला तर तोही येत नाही. हेडफोन विकत घ्यावा लागतो. हल्ली लोकांना ब्लूटूथ इअरफोनची देखील मोठी क्रेझ आहे. 

आज तुम्ही मोबाईलच्या मोठमोठ्या दुकानांत पहाल तर तुम्हाला ऑनलाईन मागवून देखील मोबाईल जास्त किंमतीला दिले जातात. सुरुवातीला तुम्ही होलसेल बाजारातून पाच पाच पीस अशा वस्तू ठेवू शकता. याचबरोबर शहरातील किंवा परिसरातील आसपासच्या दुकानांमध्ये जाऊन त्यांना मालही पुरवू शकता. ही उत्पादने घेणारी काही एकच कंपनी नसते. त्यामुळे स्पर्धाही खूप असते. अशावेळी लोकांना आणि दुकानदारांना स्वस्त आणि दर्जेदार वस्तू हवी असते. १२-१५ रुपयांची डेटा केबल तुम्ही ५०-१०० रुपयांना विकू शकता. मोबाईल कव्हर २०-३० रुपयांना मिळते ते बाजारात १०० रुपयांना विकले जाते. हेडफोन देखील डुप्लिकेट ते ओरिजिनल असे विकता येतात. स्क्रीन गार्ड ३०-४० रुपयांना होलसेलमध्ये मिळतो, ते दुकानात १००-१५० रुपयांना विकला जातो. अशाप्रकारे तुम्ही पार्टटाईमही बिझनेस करू शकता.  

टॅग्स :व्यवसाय