Join us  

Business Idea: फक्त ५ हजार गुंतवा अन् महिन्याला लाखो कमवा; तुमच्या बिझनेसला सरकारही करेल मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 4:31 PM

Business Idea: कोरोनाच्या कालावधीनंतर हा व्यवसाय खूप तेजीत आला असून, कमी जागा आणि कमी गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, असे सांगितले जाते.

Business Idea: अनेकांना आपला स्वतःचा बिझनेस असावे असे वाटत असते. तर काही जण अतिरिक्त कमाई करण्यासाठी स्वतःचा वेगळा बिझनेस सुरू करतात. देशातील अनेक ठिकाणी गृहिणी घर-संसार सांभाळूनही बिझनेस करताना दिसतात. त्यात त्या यशस्वीही होतात. मात्र, बिझनेस सुरू करायचा म्हणजे अनेक गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यातील प्रमुख भाग म्हणजे भांडवल. अतिशय कमी भांडवलात चांगली कमाई करून देणारे अनेक बिझनेस आहेत. 

तुमची नोकरी सांभाळून कमी मेहनतीत अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल किंवा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा बिझनेस तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल माहिती देत आहोत, त्यातून तुम्ही दर महिन्याला बंपर कमाई करू शकता. कोरोनाच्या कालावधीनंतर हा व्यवसाय खूप तेजीत आल्याचे सांगितले जात आहे. हा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करता येतो. यासाठी तुम्हाला थोडी जागा तसेच ५ हजारांची गुंतवणूक करावी लागेल. 

नेमका कोणता आहे हा बिझनेस?

आपल्या देशात चहाचे चाहते खूप लोकं आहेत. चहा प्यायला लोकांना खूप आवडतो. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कुल्हडमधील चहाला मागणी आहे. रेल्वे स्टेशन, बस डेपो आणि विमानतळांवर कुल्हड चहाची वारंवार मागणी असल्याचे पाहायला मिळते. अशावेळी तुम्ही कुल्हड तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी ५ हजार रुपयांची गुंतवणूक करता येऊ शकते. इतेकच नाही, तर सरकारही या व्यवसायाला प्रोत्साहन आणि मदत देते. कुल्हड व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने एक योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशभरात मोफत इलेक्ट्रिक चक्र देते. त्यापासून ते कुल्हडसह अन्य मातीची भांडी तयार केली जाऊ शकतात. यानंतर सरकारही तयार केलेले कुल्हड चांगल्या किमतीत विकत घेते.

किती किंमत मिळते कुल्हडला?

या व्यवसायाशी संबंधित उत्पन्न वाढावे यासाठी केंद्र सरकारही कुल्हडची मागणी वाढवण्यावर भर देत आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही कुल्हडला प्रोत्साहन देण्यासाठी प्लास्टिक आणि पेपर कपमध्ये चहा देण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. चहाचा कुल्हड किफायतशीर तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित मानला जातो. चहाच्या कुल्हडची किंमत ५० रुपये प्रति शेकडा आहे. तर लस्सीच्या कुल्हडची किंमत १५० रुपये प्रति शेकडा आहे. तसेच दुधाच्या कुल्हडची किंमतही १५० रुपये प्रति शेकडा आहे. तसेच अन्य प्रकारच्या कुल्हडला १०० रुपये प्रति शेकड्याचा भाव मिळू शकतो. मागणी वाढल्यास चांगली किंमत मिळण्याचीही शक्यता आहे.

(टीप - या लेखात गुंतवणूकीसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा आणि जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकआयडिया