Join us

बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 09:29 IST

Recruitment In Banking-Finance Sector: देशातील बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, २०३० पर्यंत या क्षेत्रात तब्बल २.५० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ‘अडेको इंडिया’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रात पुढील वर्षी (२०२५-२६) साधारण ८.७ टक्के आणि २०३० पर्यंत सुमारे १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे. 

नवी दिल्ली - देशातील बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) क्षेत्रात मोठी वाढ होणार असून, २०३० पर्यंत या क्षेत्रात तब्बल २.५० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे ‘अडेको इंडिया’च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. या क्षेत्रात पुढील वर्षी (२०२५-२६) साधारण ८.७ टक्के आणि २०३० पर्यंत सुमारे १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या नोकऱ्या केवळ मोठ्या महानगरांपुरत्या मर्यादित नसून, पुणे, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इंदूर आणि लखनौसारख्या दुसऱ्या, तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये संधी निर्माण होत असून इथे ४८% नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील. 

नोकऱ्यांत वाढ का होत आहे? ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मागणी प्रचंड वाढली आहे. या नोकऱ्यांमध्ये चांगले वेतन मिळणार असून, उमेदवारांना १०-१५% अधिक पगार मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान आणि प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव असलेल्यांना नोकरीची शक्यता २.५ पट जास्त आहे. 

ऑनलाइन कोर्सेसची मदतआजकाल ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स बँकिंग क्षेत्रासाठी विशेष कोर्सेस देत आहेत. यामध्ये आर्थिक विश्लेषण, डेटा सायन्स, ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि फिनटेक यांचा समावेश आहे. यामुळे उमेदवार घरातूनच या क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये शिकू शकतात आणि नोकरीच्या संधीसाठी अधिक पात्र होऊ शकतात.

कोणकोणत्या नोकऱ्या मिळणार? सेल्स आणि रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह I डिजिटल प्रॉडक्ट मॅनेजर्स I क्रेडिट रिस्क ॲनालिस्ट्स I क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि चॅटबॉट डेव्हलपर्स I सेबी सर्टिफाइड गुंतवणूक सल्लागार I एम्बेडेड फायनान्स प्रॉडक्ट मॅनेजर्स I डेटा सायंटिस्ट आणि एआय/एमएल इंजिनिअर्स I एआय-आधारित क्लेम स्पेशालिस्ट्स I फ्रॉड डिटेक्शन ॲनालिस्ट्स I मायक्रो विमा एजंट I ॲक्च्युरियल आणि ग्राहक सेवा टीम्स I सायबर सुरक्षातज्ज्ञ I ईएसजी स्ट्रॅटेजी प्रमुख I एआयएफ/पीएमएस कम्प्लायन्स अधिकारी I डिजिटल वेल्थ मॅनेजर्स

टॅग्स :नोकरीबँकिंग क्षेत्र