Senior Citizen Concession : येत्या १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्प २०२६ मध्ये केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीच्या काळापासून बंद करण्यात आलेली रेल्वे तिकीट सवलत पुन्हा बहाल करण्याबाबत रेल्वे मंत्रालय आणि वित्त मंत्रालयामध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे ६० वर्षांवरील पुरुष आणि ५८ वर्षांवरील महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोविड काळातील बंदी आणि रेल्वेचा युक्तिवादमार्च २०२० मध्ये कोरोना संकट ओढवल्यानंतर रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत तात्पुरती स्थगित केली होती. रेल्वेवर दरवर्षी या सवलतीमुळे १,६०० ते २,००० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडतो, असा युक्तिवाद करत ही सुविधा बंदच ठेवण्यात आली होती. मात्र, आता रेल्वेचे उत्पन्न वाढल्याने ही सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.
सवलतीचे स्वरूप कसे होते?कोविडपूर्वी रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना खालीलप्रमाणे सवलत दिली जात असे.
- पुरुष (६० वर्षांवरील) : तिकीट दरात ४०% सूट.
- महिला (५८ वर्षांवरील) : तिकीट दरात ५०% सूट.
- लागू श्रेणी : स्लीपर क्लासपासून ते फर्स्ट एसीपर्यंतच्या (3AC, 2AC, 1AC) सर्व श्रेणींमध्ये ही सवलत मिळत असे.
बजेट २०२६ कडून काय आहेत अपेक्षा?सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी अर्थसंकल्पात या सवलतीची घोषणा होऊ शकते. काही प्रस्तावांमध्ये ही सवलत केवळ स्लीपर आणि ३-टियर एसी पुरती मर्यादित ठेवण्याचाही विचार सुरू आहे, जेणेकरून रेल्वेवर जास्त आर्थिक बोजा पडणार नाही. मात्र, सर्वच वर्गातील ज्येष्ठांना पूर्वीप्रमाणे सवलत मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.
वाचा - मुलांच्या नावे PPF खाते उघडताय? सावधान! 'या' छोट्या चुकांमुळे बुडू शकते लाखो रुपयांचे व्याज
ज्येष्ठांसाठी ही सवलत का महत्त्वाची?अनेक ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा किंवा मुलांकडे जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात. वाढत्या महागाईच्या काळात निवृत्तीवेतनावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठांसाठी ही सवलत केवळ आर्थिक मदत नसून, त्यांच्या सन्मानजनक प्रवासासाठी आवश्यक मानली जाते. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासात ५० टक्क्यांपर्यंतची सूट प्रवासाचा खर्च निम्म्याने कमी करते.
Web Summary : Budget 2026 may restore rail fare concessions for senior citizens, suspended during the pandemic. The move aims to ease travel costs for those over 60 (men) and 58 (women), potentially focusing on sleeper and 3-tier AC classes to manage railway finances.
Web Summary : बजट 2026 में वरिष्ठ नागरिकों के लिए रेल किराए में छूट बहाल हो सकती है, जो महामारी के दौरान निलंबित कर दी गई थी। इस कदम का उद्देश्य 60 (पुरुष) और 58 (महिला) वर्ष से अधिक आयु वालों के लिए यात्रा लागत को कम करना है, संभावित रूप से रेलवे वित्त का प्रबंधन करने के लिए स्लीपर और 3-टीयर एसी कक्षाओं पर ध्यान केंद्रित करना है।