Join us  

Budget 2021: बजेटचा जलवा! सामान्यांना 'कोहळा', तरीही शेअर बाजार 50000 क्रॉस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 10:46 AM

Share Market after Union Budget 2021: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्यांना करदिलासा दिलेला नसली तरीही हे बजेट शेअर बाजाराने उचलून धरले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये सामान्यांना करदिलासा दिलेला नसली तरीही हे बजेट शेअर बाजाराने उचलून धरले आहे. गेल्या आठवड्यात धाडकन कोसळलेल्या निर्देशांकाने 50000 चा आकडा पार केला होता. तर दुसरीकडे निफ्टीनेही रेकॉर्ड कामगिरी नोंदविली आहे. 

बजेट सादर होताच शेअर बाजाराने उसळी घेतली होती. मात्र, आज बाजार सुरु होताच शेअर बाजाराने 50,004.06 चा आकडा गाठला होता. सकाळी 09:34 वाजता BSE Sensex 1,403.45 वाढला होता. तर NSE चा निफ्टीदेखील 411 अंकांनी वाढून 14,692.80 च्या स्तरावर ट्रेंड करत होता. 

सोमवारी सेन्सेक्स 48,600.61 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी सेन्सेक्स 49,193.26 अंकांवर उघडला. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये मोठी वाढ झाली. HDFC च्या समभागांत 6.47 टक्क्यांची वाढ दिसून आलीय याशिवाय लार्सन अँड टुब्रो, एसबीआय, बजाज फायनान्स, एक्सिस बँक, कोटक बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, आयसीआयसीआय बँकांच्या शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली. याशिवाय ओएनजीसी, बजाज फिनसर्व, इंडसइंड बँक, एशियन पेंट, महिंद्रा एंड महिंद्रा, मारुती, टेक महिंद्रा, एनटीपीसी, टीसीएस, टायटन, इन्फोसिस, बजाज ऑटो, पावरग्रिड, सन फार्मा, एचसीएल टेक, भारती एयरटेल, नेस्ले इंडिया, डॉक्टर रेड्डीज आणि रिलायन्सचे शेअरही हिरव्या निशानावर होते. 

गेल्या आठवड्यात मोठी घसरणसध्या सेन्सेक्स 49692 वर ट्रेंड करत आहे. गुंतवणूकदारांना बजेटपूर्व चिंतेने ग्रासल्याने आणि नफेखोरी सुरु झाल्याने सेन्सेक्स जवळपास चार दिवसांत सेन्सेक्स 2,350 अंकांनी घसरला होता. तर साधारणता दीड आठवड्यांपूर्वी अमेरिकेच जो बायडेन पर्व सुरु होताच सेन्सेक्सने पहिल्यांदाच ऐतिहासिक 50000 चा टप्पा पार केला होता. तेव्हा सेन्सेक्स 50,096.57 आणि निफ्टी 14730 वर होता. अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष जो बायडेन यांनी बुधवारी 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली होती. 

टॅग्स :शेअर बाजारबजेट 2021निर्मला सीतारामन