Join us  

budget 2021 : सोने- चांदीवरील आयात शुल्कामध्ये कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 5:02 AM

budget 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे. सध्या १२.५ टक्के असलेले हे शुल्क ७.५ टक्क्यांवर आणले जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोने आणि चांदीवरील आयात शुल्क कमी केले आहे. सध्या १२.५ टक्के असलेले हे शुल्क ७.५ टक्क्यांवर आणले जाणार आहे. यामुळे सोन्याच्या तस्करीला पायबंद बसेल, असे त्यांनी सांगितले. याचा परिणाम म्हणून चांदीच्या दरामध्ये एक हजार रुपये प्रति किलो तर सोने ५०० रुपये प्रति १० ग्रॅम अशी घट झाली आहे.  

७.५%पर्यंत सोने आणि चांदीवरील  आयात शुल्क कमी केले यंदाच्या अर्थसंकल्पात आयात शुल्कात कपात करण्यात आल्याने त्याचा व्यावसायिकांसह ग्राहकांनाही लाभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

चांदीत घसरण; सोन्याच्या भावात घटनवी दिल्ली/जळगाव : केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सुवर्ण बाजारात मोठा चढ-उतार होताना दिसून आला व एकाच दिवसात तीन वेळा सोने-चांदीचे भाव बदलले. यात अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात होताच भाववाढ झाली, तर अर्थसंकल्पादरम्यान आयात शुल्क कमी केल्याची घोषणा झाल्यानंतर सोने-चांदीचे भाव कमी झाले. दिवसभरातील या चढ-उतारानंतर चांदी ७४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर, तर सोने ४९ हजार ९०० रुपयांवर स्थिरावले.

टॅग्स :बजेट 2021सोनं