Join us  

Budget 2021 Automobile Sector: गाडी खरेदीच्या विचारात असलेल्यांसाठी गुड न्यूज; खिशावरचा ३०% भार हलका होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 1:01 PM

Budget 2021 Latest News and updates: वाहन निर्मिती क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प (Budget 2021) सादर करत आहेत. सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी वाहन क्षेत्रासाठी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग पॉलिसीची (Voluntary Vehicle Scrappage Policy) घोषणा केली आहे. बऱ्याच कालावधीपासून वाहन क्षेत्राला याची प्रतीक्षा होती. यामुळे आता खासगी वाहनं २० वर्षांनी, तर व्यवसायिक वाहनं १५ वर्षांनी स्क्रॅप केली जातील. वाहन निर्मिती क्षेत्रासाठी ही घोषणा सकारात्मक ठरणार आहे.टाटांकडून घेतलेली 'एअर इंडिया' सरकार विकणार; 'महाराजा'चं खासगीकरण करणार!बहुप्रतिक्षित व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग धोरण लागू झाल्यानं मरगळ आलेल्या वाहन क्षेत्राला दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नव्या गाड्यांची मागणी वाढल्यानं वाहन निर्मिती क्षेत्राला गती मिळू शकेल. यामुळे वाहनांच्या किमती ३० टक्क्यांपर्यंत खाली येतील. जुन्या वाहनांमुळे होणारं प्रदूषण २५ टक्क्यांनी कमी होईल. याशिवाय स्क्रॅप व्यवसायाला चालना मिळाल्यानं रोजगार निर्माण होतील.रेल्वे अन् मेट्रोबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा; नाशिक, नागपूरमधील प्रकल्पांना मिळणार चालनाअर्थमंत्र्यांनी व्हॉलेंटरी स्क्रॅपिंग धोरणाची घोषणा करताच महिंद्रा एँड महिंद्रा, मारुती, बजाज ऑटो, अशोक लेलँडच्या समभागांनी उसळी घेतली. या कंपन्यांच्या समभागांचं मूल्य २ टक्क्यांनी वधारलं. काही आठवड्यांपूर्वीच सरकारनं नव्या स्क्रॅपिंग धोरणाला मंजुरी दिली. एप्रिल २०२२ पासून या धोरणाची अंमलबजावणी सुरू होईल. यानंतर वाहन क्षेत्राला नवचैतन्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :बजेट 2021निर्मला सीतारामनवाहन उद्योग