Join us  

Budget 2019:  मोदी सरकारनं महागाईचं कंबरडं मोडलं, पियुष गोयल यांनी थोपटली स्वत:चीच पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 11:48 AM

पंतप्रधान ग्राम सडक योजनेवर ९0, 000 कोटी खर्च केले, १४३ कोटी एलईडी बल्ब उपलब्ध केले, पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत स्वस्तात औषधे मिळतात, ५0 कोटी लोकांसाठी आयुष्यमान योजना आणली, त्यातून गरिबांसाठी ३000 कोटी रुपये वाचविल, २0२१ पर्यंत सर्व इच्छूक परिवारांना वीज मिळेल, अशा शब्दात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करुन केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

ठळक मुद्देविविध योजनांचा उल्लेख २0१८-१९ चा अंतरिम अर्थसंकल्प

नवी दिल्ली : पंतप्रधान ग्राम सडक योजनेवर ९0, 000 कोटी खर्च केले, १४३ कोटी एलईडी बल्ब उपलब्ध केले, पंतप्रधान जनऔषधी योजनेंतर्गत स्वस्तात औषधे मिळतात, ५0 कोटी लोकांसाठी आयुष्यमान योजना आणली, त्यातून गरिबांसाठी ३000 कोटी रुपये वाचविल, २0२१ पर्यंत सर्व इच्छूक परिवारांना वीज मिळेल, अशा शब्दात केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा उल्लेख करुन केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत २0१८-१९ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळालेल्या पियुष गोयल यांनी सरकारने वर्षभरात केलेल्या विविध योजनांची माहिती देण्याची ही सुवर्णसंधी सोडली नाही. आम्ही महागाईचे कंबरडे मोडले आहे. आम्ही आता आत्मविश्वासाने सांगू शकतो ,की भारत पुन्हा एकदा रुळावर येत आणि विकास व समृध्दिकडे अग्रेसर होत आहे, असे त्यांनी सांगितले.आम्ही विचार बदलण्याचा अथक प्रयत्न केला आणि देशाचा आत्मविश्वास वाढविला, असे सांगून गोयल म्हणाले, सर्वांना अन्न मिळेल, याचा आम्ही विचार केला आहे. आम्ही सर्व राज्यांना ४२ टक्के वाटा दिला आहे. जगातील आठव्या क्रमांकावरील अर्थव्यवस्था भारताची ठरली आहे.भारतावर सर्वात पहिला हक्क गरिबांचा आहे. जवळपास ६ लाख गाव उघड्यावर शौचास बसत होते, त्यापासून त्यांना आम्ही मुक्त केले. स्वस्त अन्नासाठी १.७ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. तीन लाख कोटी रुपयांची कर्जवापसी झाली आहे. बड्या उद्योंजकांवर कर्जवापसीसाठी दबाव आणला आहे. बँकिंग व्यवस्थेत झपाट्याने सुधारणा होत आहे.

टॅग्स :अर्थसंकल्प 2019सरकारपीयुष गोयलअर्थसंकल्पभाजपा