Join us

२०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळतेय ७० दिवसांची व्हॅलिडिटी, BSNLचा स्पेशल प्लान पाहा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:30 IST

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सर्वच खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत लक्षणीय वाढ केली होती, त्यानंतर युजर्सच्या खिशाला मोठी कात्री लागली होती. त्यावेळी स्वस्त रिचार्ज प्लानसाठी अनेकांनी आपला नंबर बीएसएनएलला पोर्ट केला होता. बीएसएनएल आपल्या युजर्सना स्वस्त रिचार्ज प्लानसोबत अनेक सेवा देते.

आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या एका रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत, जो तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लानमध्ये तुम्हाला पूर्ण ७० दिवसांची वैधता मिळेल. आम्ही बीएसएनएलच्या १९७ रुपयांच्या रिचार्ज प्लानबद्दल सांगत आहोत.

बीएसएनएलचा १९७ रुपयांचा प्रीपेड प्लान

बीएसएनएलचा १९७ रुपयांचा प्लान ७० दिवसांच्या वैधतेसह येतो. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्संना पहिल्या १८ दिवसांत अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसंच दररोज २ जीबी डेटा आणि १०० फ्री एसएमएसही मिळतात. १८ दिवसांनंतर बीएसएनएलच्या या प्लानमध्ये युजर्संना कोणताही फायदा मिळत नाही पण उर्वरित दिवस सिम अॅक्टिव्ह राहते.

टॅग्स :बीएसएनएल