Join us

BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:15 IST

BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लान्ससाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लान्ससाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इतर दूरसंचार कंपन्यांच्या तुलनेत, BSNL आपल्या युजर्सना अतिशय स्वस्त रिचार्ज प्लान्स ऑफर करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला स्वस्त रिचार्ज प्लानचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही तुमचा नंबर बीएसएनएलचा विचार करू शकता.

बीएसएनएल देखील आपल्या नेटवर्कवर खूप वेगानं काम करत आहे. BSNL नं अलीकडेच अनेक शहरांमध्ये आपलं 4G नेटवर्क लाँच केलं आहे. अशा परिस्थितीत आता बीएसएनएल वापरकर्तेही वेगवान इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय बीएसएनएलकडून 5G नेटवर्कवरही काम केलं जात आहे. अशा परिस्थितीत लवकरच BSNL युजर्स 5G नेटवर्कचा लाभ घेऊ शकतील.

'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या अशा ३ रिचार्ज प्लान्सबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खूप चांगले फायदे मिळू शकतात. जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

१. बीएसएनएलचा ४३९ रुपयांचा प्लान

बीएसएनएलचा ४३९ रुपयांचा हा प्लान ८० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो, ज्याची किंमत ५०० रुपयांपेक्षा कमी आहे.

व्हॅलिडिटी: ८० दिवस.

कॉलिंग: अनलिमिटेड फ्री कॉलिंग.

एसएमएस: ३०० फ्री एसएमएस.

डेटा : या प्लॅनमध्ये डेटा बेनिफिट समाविष्ट नाही. त्यामुळे वाय-फाय (Wi-Fi) युजर्ससाठी हा प्लान सर्वोत्तम आहे.

२. बीएसएनएलचा ३४७ रुपयांचा प्लान

बीएसएनएलचा ३४७ रुपयांचा रिचार्ज प्लान ५० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह उपलब्ध आहे.

व्हॅलिडिटी: ५० दिवस.

कॉलिंग: अनलिमिटेड फ्री कॉलिंग.

डेटा: दररोज २ जीबी डेटा.

एसएमएस: दररोज १०० फ्री एसएमएस.

डेटा : दररोजचा डेटा संपल्यानंतर युजर्स ८० केबीपीएसच्या स्पीडनं डेटा वापरू शकतात.

३. बीएसएनएलचा ३१९ रुपयांचा प्लान

बीएसएनएलचा ३१९ रुपयांचा प्लान ६० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो, हा प्लानही ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतो.

व्हॅलिडिटी: ६० दिवस.

कॉलिंग: अनलिमिटेड फ्री कॉलिंग.

डेटा: १० जीबी डेटा.

एसएमएस: ३०० फ्री एसएमएस.

English
हिंदी सारांश
Web Title : Best BSNL Recharge Plans Under ₹500: Benefits and Details

Web Summary : BSNL offers affordable recharge plans, including ₹439, ₹347, and ₹319 options. These plans provide calling, data, and SMS benefits with varying validity periods, catering to different user needs and budgets. BSNL is also expanding its 4G and 5G network.
टॅग्स :बीएसएनएल५जीसरकार