Join us

BSNL नं लाँच केला स्वस्त रिचार्ज प्लान; ₹३५० पेक्षाही स्वस्तात अनलिमिटेड बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:33 IST

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएल लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे.

BSNL Recharge Plans: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीएसएनएल लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय होत आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे बीएसएनएलनं दिलेले स्वस्त रिचार्ज प्लान. बीएसएनएल कंपनी आपल्या युजर्सना इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. अशातच गेल्या काही महिन्यांत अनेकांनी आपला नंबर ही बीएसएनएलला पोर्ट केला आहे.

बीएसएनएलच्या ४जी नेटवर्कबद्दल बोलायचं झालं तर बीएसएनएल आपल्या ४जी नेटवर्कचा विस्तार अतिशय वेगानं करत आहे. बीएसएनएलनं आतापर्यंत ६५ हजार नवे फोरजी मोबाइल टॉवर लाईव्ह केले आहेत. बीएसएनएल आपल्या ४जी नेटवर्कनंतर लवकरच ५जी सेवेवर काम सुरू करणार आहे.

बीएसएनएलचा नवा रिचार्ज प्लान

बीएसएनएलनं आणखी एक नवीन स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केला आहे, ज्यामुळे युजर्सना दिलासा मिळणारे. बीएसएनएलनं आपल्या एक्स हँडलवर पोस्ट करून ही माहिती दिली. बीएसएनएलचा नवा रिचार्ज प्लान तुम्ही ३५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या प्लानमध्ये तुम्हाला ५४ दिवसांची वैधता मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या नव्या प्लानमध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी.

बीएसएनएलचा ३४७ रुपयांचा प्रीपेड प्लान

बीएसएनएलच्या ३४७ रुपयांच्या प्लानची वैधता ५४ दिवसांची आहे. ५४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. तसेच दररोज २ जीबी हायस्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएसचा ही लाभ मिळतो. एवढंच नाही तर या प्लानमध्ये युजर्संना बायटीव्हीचं फ्री सब्सक्रिप्शनही मिळतं.

टॅग्स :बीएसएनएल