Join us  

BSNL कडून ग्राहकांना गिफ्ट; स्वस्त केले Prepaid प्लॅन्स; ५४ रूपयांपासून सुरू होणार किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 12:07 PM

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नं आपल्या तीन प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत कपात केली आहे. 

ठळक मुद्देसरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नं आपल्या तीन प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत कपात केली आहे. 

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नं आपल्या तीन प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्लॅन्सची किंमत बदलली आहे त्यामध्ये ५६ रूपये, ५७ रूपये आणि ५८ रूपयांच्या (STV 56, STV 57 आणि STV 58) स्पेशल टॅरिफ व्हाउचर्सचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, या प्लॅन्ससोबत मिळणाऱ्या बेनिफिट्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाहूया यात कोणते बेनिफिट्स मिळतायत आणि किती आहे किंमत.

कंपनीनं ५६ रूपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये २ रूपयांची कपात केली आहे. हे व्हाउचर आता ५४ रुपयांना मिळणार आहे. यासोबत ८ दिवसांची वैधता दिली जाते. तसंच यामध्ये ग्राहकांना कॉलिंगसाठी ५६०० सेकंद दिली जातात.

कंपनीच्या ५७ रूपयांच्या स्पेशल टॅरिफ व्हाउचरमध्ये १ रूपयांची कपात करण्यात आली आहे. यानंतर या व्हाउरची किंमत ५६ रूपये झाली आहे. यासोबत ग्राहकांना १० जीबी डेटा आणि ing Entertainment music चं मोफच सबस्क्रिप्शन देण्यात येणार आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना १० दिवसांची वैधता देण्यात येत आहे. 

५८ रूपयांचा प्लॅनया प्लॅनमध्येही कंपनीनं १ रूपयाची कपात केली आहे. आता या प्लॅनचा लाभ ५७ रूपयांमध्ये घेता येईल. यामध्ये ग्राहकांना आंतरराष्ट्रीय रोमिंग अॅक्टिव्हेट किंवा एक्स्टेंड करण्याची सुविधा मिळते. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. सध्या हे बदल केरळ टेलिकॉम सर्कलसाठी लागू करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. हे नवे दर १८ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आलेत.

टॅग्स :बीएसएनएलभारत