Join us

BSNL नं आणला जबरदस्त प्लान; मिळणार ५०००जीबी डेटा; किंमत १००० रुपयांपेरक्षाही कमी, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:06 IST

BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

BSNL Recharge Plan: भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. बीएसएनएल आपल्या युजर्सला इतर खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. अशा तऱ्हेनं अनेक जण हळूहळू बीएसएनएलकडे वळत आहेत. 

आता बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी धमाकेदार रिचार्ज प्लान आणला आहे. बीएसएनएलचा हा रिचार्ज प्लान सर्वात खास प्लान आहे, कारण बीएसएनएल या प्लानमध्ये युजर्संना पूर्ण ५००० जीबी हायस्पीड डेटा देत आहे. चला जाणून घेऊया बीएसएनएलच्या ५००० जीबी डेटा असलेल्या नवीन रिचार्ज प्लानबद्दल.

म्युच्युअल फंड की सुकन्या समृद्धी : मुलांच्या उच्च शिक्षणासाठी कशात गुंतवणूक करणं अधिक फायद्याचं?

बीएसएनएलचा नवा रिचार्ज प्लान

बीएसएनएलनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून आपल्या नवीन रिचार्ज प्लानबद्दल आपल्या युजर्सना सांगितलं आहे. बीएसएनएलचा हा प्लान बीएसएनएलचा ब्रॉडबँड प्लॅन आहे, ज्यामध्ये कंपनी युजर्संना २०० एमबीपीएसच्या जलद स्पीडवर ५००० जीबी डेटा देत आहे. तर डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्स ४ एमबीपीएसच्या स्पीडवर अनलिमिटेड डेटा वापरू शकतात.

किंमत १००० रुपयांपेक्षा कमी

बीएसएनएलच्या या नव्या ब्रॉडबँड प्लानची किंमत फक्त ९९९ रुपये आहे, ज्यामध्ये तुम्ही १ महिन्यासाठी ५००० जीबी डेटाचा लाभ घेऊ शकता. यामध्ये तुम्ही हायस्पीड इंटरनेट सेवा, चित्रपट आणि डाउनलोडिंगचा आनंद घेऊ शकता. बीएसएनएलचा हा प्लान अपग्रेड करण्यासाठी तुम्ही १८००-४४४४ वर "Hi" मेसेज पाठवू शकता.

टॅग्स :बीएसएनएल