BSNL Recharge Plan : भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. सर्व टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यानंतर अनेकांनी आपला मोर्चा बीएसएनएलकडे वळवलाय. त्यानंतर अनेकांनी आपले नंबरही बीएसएनएलमध्ये पोर्ट केले. एवढंच नाही तर बीएसएनएल आपल्या ४जी आणि ५जी सेवेवरही खूप वेगानं काम करत आहे. आता बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी खास ऑफर लाँच केलीये. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलनं ही ऑफर आणली आहे. जाणून घेऊ कोणती आहे ही ऑफर.
बीएसएनएलने फेस्टिव्ह सीझन ऑफर आणली आहे, ज्यामध्ये बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केलाय. या प्लॅनची किंमत २७७ रुपये आहे. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये युजर्सना कोणते बेनिफिट्स मिळतील.
बीएसएनएलचा २७७ रुपयांचा प्रीपेड प्लान
बीएसएनएलच्या २७७ रुपयांच्या प्लानची वैधता ६० दिवसांची आहे. ६० दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळणार आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्स ४० केबीपीएसच्या स्पीडवर अनलिमिटेड डेटाचा फायदा घेऊ शकतात.
कधीपर्यंत घेता येणार लाभ
बीएसएनएलच्या २७७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनचा फायदा तुम्ही १६ जानेवारीपर्यंतच घेऊ शकता, म्हणजेच तुम्हाला हा प्लॅन १६ जानेवारीपूर्वी खरेदी करावा लागेल. बीएसएनएलनं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.