भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही भारतातील एकमेव सरकारी दूरसंचार कंपनी आहे. बीएसएनएल आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आता बीएसएनएलनं आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे, याअंतर्गत बीएसएनएलनं आपल्या ३ रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत. मदर्स डेनिमित्त बीएसएनएलनं ही ऑफर आणली आहे. चला तर मग जाणून घेऊया बीएसएनएलने आपल्या कोणत्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती कमी केल्या आहेत.
बीएसएनएल मदर्स डे ऑफर
बीएसएनएलनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करताना आपल्या मदर्स डे ऑफरबद्दल सांगितलं आहे. ७ मे ते १४ मे २०२५ या कालावधीत बीएसएनएल आपल्या तीन रिचार्ज प्लॅनवर पूर्ण ५ टक्के सूट देत आहे. अशा परिस्थितीत लोकांना हे तिन्ही रिचार्ज प्लॅन कमी किंमतीत मिळणार आहेत.
बीएसएनएलचे हे तीन प्लॅन झालेत स्वस्त
बीएसएनएलचा पहिला प्लॅन २३९९ रुपयांचा आहे. या प्लॅनची किंमत आता २२७९ रुपये झाली आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, डेली २ जीबी डेटा आणि ३९५ दिवसांसाठी दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो.
बीएसएनएलचा दुसरा प्लॅन ९९७ रुपयांचा आहे. या प्लॅनची किंमत आता ९४७ रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये १६० दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, डेली २ जीबी डेटा आणि डेली १०० फ्री एसएमएस मिळतात.
बीएसएनएलचा तिसरा प्लॅन ५९९ रुपयांचा आहे. या प्लॅनची किंमत आता ५६९ रुपये झाली आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, डेली ३ जीबी डेटा आणि डेली १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो.