Join us

BPCL Privatisation: ६ पैकी ५ खरेदीदारांनी घेतली माघार?; भारत पेट्रोलियम विकण्यासाठी सरकारनं तयार केला 'हा' प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 22:01 IST

BPCL Privatisation: सरकार निर्गुतवणुकीच्या मार्गावर पुढे जात आता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेच्या विक्रीसाठी नव्या मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे.

BPCL Privatisation: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (BPCL) विक्रीचा सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता त्याची विक्री करण्याचा नवा मार्ग काढण्यासाठी सरकारच्या अंतर्गत चर्चा सुरू आहेत. दीपमचे (DIPAM) सचिव तुहीन कांत पांडे यांनी या प्रकारचे संकेत दिले आहेत.

इंडिया टुडेच्या बजेट २०२२-२३ राउंडटेबल कार्यक्रमामध्ये गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) विभागाचे सचिव तुहिन कांत पांडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं. "आम्हाला भारत पेट्रोलियमच्या निर्गुंतवणुकीसाठी प्रारंभिक बोली प्राप्त झाल्या आहेत. परंतु या बोली फायनॅन्शिअल बिड्समध्ये बदलू शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत, विद्यमान बोलीदारांनी आर्थिक बोली पुढे न केल्यास, सरकार पुन्हा नव्याने बोली मागवेल. याबाबतची स्थिती काही दिवसांत स्पष्ट होईल," असे पांडे म्हणाले.

या कंपन्यांना स्वारस्यआतापर्यंत वेदांता समुह, खासगी इक्विटी फर्म अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेयर्ड कॅपिटलचं थिंक गॅस युनिटनं बीपीसीएलमध्ये सरकारची ५२.९८ टक्के भागीदारी विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे. ही कंपनी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत विकली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सीएनबीसी टीव्ही १८ नं आपल्या एका रिपोर्टमध्ये अधिकृत सूत्रांच्या हवाल्यानं बीपीसीएलच्या खरेदीत स्वारस्य दाखवणाऱ्या सहा कंपन्यांपैकी पाच कंपन्यांनी माघार घेतल्याचं म्हटलं आहे. तसंच या स्पर्धेत आता केवळ वेदांता समुहच आघाडीवर आहे.

काय मिळणार खरेदीदारालाभारत पेट्रोलियमची बोली जिंकणाऱ्या कंपनीला भारत रिटेल फ्युअल मार्केटमध्ये २५.७७ टक्के भागीदारी मिळेल. याशिवाय देशातील एकूण पेट्रोलियम रिफानिंग क्षमतेपैकी १५.३ टक्के हिस्साही मिळेल. कंपनीकडे सध्या मुंबई, कोच्ची, बीना आणि नुमलीगढमध्ये चार रिफायनरीज आहेत. याची एकूण क्षमता ३.८३ कोची टन वार्षिक पेट्रोलियम रिफाइन करण्याची आहे.

टॅग्स :सरकारव्यवसाय