Join us

सप्टेंबरपर्यंत बीपीसीएल, एअर इंडियाची समभाग विक्री, एलआयसीचा आयपीओ येणार ऑक्टोबरनंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 06:36 IST

Central Government News : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी बीपीसीएल आणि एअर इंडिया यांची विक्री पुढील वित्त वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच सप्टेंबरपर्यंत केली जाईल

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी बीपीसीएल आणि एअर इंडिया यांची विक्री पुढील वित्त वर्षाच्या मध्यापर्यंत म्हणजेच सप्टेंबरपर्यंत केली जाईल, तसेच आयुर्विमा महामंडळाचा आयपीओ ऑक्टोबरनंतर बाजारात उतरविला जाईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.निर्गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीनकांत पांडेय यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेला कोरोनातून बाहेर काढण्यासाठी सरकारने १.७५ लाख कोटींचा निधी आपल्या मालमत्ता विकून उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बीपीसीएल आणि एअर इंडियाची विक्री केली जात आहे, तसेच एलआयसीचा आयपीओ आणला जात आहे. याशिवाय शिपिंग कॉर्पोरेशन, आयडीबीआय बँक आणि आणखी इतर दोन सरकारी बँकांची विक्रीही आगामी वित्त वर्षात केली जाणार आहे.

टॅग्स :केंद्र सरकारव्यवसाय