Join us

अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:05 IST

Shah Rukh Khan Networth: २०२५ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप खास ठरलं आहे. नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर आता त्यांनी अब्जाधीशांच्या क्लबमध्येही त्याची एन्ट्री झालीये. पाहा किती आहे त्याची संपत्ती.

Shah Rukh Khan Networth: २०२५ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूप खास ठरलं आहे. नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर आता त्यांनी अब्जाधीशांच्या क्लबमध्येही त्याची एन्ट्री झालीये. हुरुन रिच लिस्ट २०२५ नुसार, किंग खानची एकूण संपत्ती ₹१२,४९० कोटी इतकी आहे, ज्यामुळे ते बॉलीवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार बनलाय. हुरुन रिच लिस्ट २०२५ मध्ये पहिल्या क्रमांकावर मुकेश अंबानी आणि दुसऱ्या क्रमांकावर गौतम अदानी आहेत.

कमाईचे मुख्य स्त्रोत

शाहरुख खानच्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग त्याच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट (Red Chillies Entertainment) या प्रोडक्शन कंपनीतून येतो. २००२ मध्ये स्थापित झालेल्या या कंपनीनं अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि यात ५०० हून अधिक लोक काम करतात. किंग खानची संपत्ती केवळ व्यवसायातूनच नाही, तर त्यांच्या भव्य रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीमुळेही वाढली आहे. त्यांचे बांद्रा येथील २०० कोटी रुपयांचे 'मन्नत' हे निवासस्थान आहे. याव्यतिरिक्त, त्यांच्याकडे लंडनच्या पार्क लेनमध्ये एक शानदार अपार्टमेंट आहे. इतकंच नाही तर, त्याच्याकडे इंग्लंडमध्ये व्हेकेशन रिट्रीट, बेव्हरली हिल्समध्ये विला आहे. एसआरकेकडे (SRK) दिल्लीतही मालमत्ता आहे, अलिबागमध्ये फार्महाऊस आहे आणि दुबईतही निवासस्थान आहे.

एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

बॉलीवूडमधील श्रीमंतांची टॉप लिस्ट

शाहरुख खान – ₹१२,४९० कोटी (रेड चिलीज एंटरटेनमेंटद्वारे)

जुही चावला आणि कुटुंब – ₹७,७९० कोटी (नाइट रायडर्स स्पोर्ट्समध्ये भागीदारी)

ऋतिक रोशन – ₹२,१६० कोटी (ब्रँड एचआरएक्स - HRX)

करण जोहर आणि कुटुंब – ₹१,८८० कोटी

अमिताभ बच्चन आणि कुटुंब – ₹१,६३० कोटी

लक्झरी कार कलेक्शन

शाहरुख खानकडे बीएमडब्ल्यू (BMW), रोल्स-रॉयस (Rolls-Royce), मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz), ऑडी (Audi), बुगाटी (Bugatti), रेंज रोव्हर (Range Rover) यांसारख्या प्रीमियम कार्सचं कलेक्शन आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shah Rukh Khan joins billionaires list; net worth revealed.

Web Summary : Shah Rukh Khan enters the billionaire club with ₹12,490 crore net worth, topping Bollywood's rich list. His wealth stems from Red Chillies Entertainment, real estate investments including 'Mannat', and luxury car collection.
टॅग्स :शाहरुख खानव्यवसाय