Join us
Daily Top 2Weekly Top 5

LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:35 IST

LPG Cylinder Price Cut: देशात १ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. पाहा काय आहेत नवे दर

LPG Cylinder Price Cut: देशात १ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलिंडरचे दर कमी झाले आहेत. ही कपात १९ किलोग्रॅमच्या कमर्शिअल सिलेंडरच्या किमतीत झाली आहे. हा सिलिंडर ५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवीन दर १ नोव्हेंबर २०२५ पासून लागू झाले आहेत.

आता १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची (Commercial LPG Cylinder) सुधारित किंमत राजधानी दिल्लीत १५९०.५० रुपये आहे. यापूर्वी ती १५९५.५० रुपये होती. १४.२ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरच्या म्हणजेच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (Domestic LPG Cylinder) दरात कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि इतर व्यावसायिक संस्थांमध्ये होतो. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत १५ रुपयांची वाढ झाली होती. ताज्या कपातीनंतर १ नोव्हेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत मुंबईत १५४२ रुपये, कोलकातामध्ये १६९४ रुपये आणि चेन्नईमध्ये १७५० रुपये झाली आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आता पाटण्यामध्ये १९ किलोग्रॅमचा सिलिंडर १८७६ रुपये, नोएडामध्ये १८७६ रुपये, लखनऊमध्ये १८७६ रुपये, भोपाळमध्ये १८५३.५ रुपये आणि गुरुगाममध्ये १६०७ रुपये मध्ये मिळेल.

घरगुती गॅस सिलिंडरची सध्याची किंमत

घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल ८ एप्रिल २०२५ रोजी झाला होता. दिल्लीत त्याची किंमत सध्या ८५३ रुपये आहे. त्याचप्रमाणे, कोलकातामध्ये ८७९ रुपये, मुंबईत ८५२.५० रुपये, चेन्नईत ८६८.५० रुपये, लखनऊमध्ये ८९०.५० रुपये, अहमदाबादमध्ये ८६० रुपये, हैदराबादमध्ये ९०५ रुपये, वाराणसीमध्ये ९१६.५० रुपये आणि पाटण्यामध्ये ९५१ रुपये आहे.

एप्रिल २०२५ पासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती स्थिर आहेत, त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. ८ एप्रिल २०२५ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून दिल्लीत किंमत ८५३ रुपयांवर पोहोचली आहे आणि हा दर आतापर्यंत लागू आहे. केंद्र सरकारनं ऑगस्ट २०२३ मध्ये घरगुती सिलिंडरवर सर्वात मोठी कपात केली. त्यावेळी सरकारनं २०० रुपयांची सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या, ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : LPG Cylinder Price Reduced: Check New Rates in Your City

Web Summary : Commercial LPG cylinder prices slashed by ₹5 from November 1st. Domestic cylinder rates unchanged. Delhi: ₹1590.50. Mumbai: ₹1542. Home cylinder stable since April 2025, Delhi ₹853.
टॅग्स :गॅस सिलेंडरमुंबईदिल्ली