Join us  

आॅनलाईन प्राप्तिकर विवरण दाखल करण्यात मोठी घट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 4:18 AM

प्राप्तिकर ई-फायलिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये कर विवरण आॅनलाईन दाखल (ई-फायलिंग) करणाऱ्या लोकांचे प्रमाण ६.६ लाखांनी घटले आहे.

नवी दिल्ली : प्राप्तिकर ई-फायलिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये कर विवरण आॅनलाईन दाखल (ई-फायलिंग) करणाऱ्या लोकांचे प्रमाण ६.६ लाखांनी घटले आहे. नोटाबंदीनंतर कर आधाराची व्याप्ती वाढणे अपेक्षित असताना हा कल चकित करणारा आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवरील आकडेवारीनुसार २०१७-१७ या वित्तीय वर्षात प्राप्तिकर ई-फायलिंग करणाºया लोकांची संख्या ६ कोटी ७४ लाख होती. २०१८-१९ या वित्तीय वर्षातील ६ कोटी ६८ लाखांवर आली. त्या आधीच्या वित्तीय वर्षात (२०१६-१७) ही संख्या ५ कोटी २८ लाख होती. ३० एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या एका अहवालानुसार ई-फायलिंगचे प्रमाण घटले आहे, ही बाब चकित करणारी आहे, असे कोटक इकॉनॉमिक रिसर्चने म्हटले आहे. तथापि, नोंदणीकृत आयकरदात्यांची संख्या वाढली आहे. यांची संख्या १५ टक्के वाढून ३१ मार्च २०१९ पर्यंत ८ कोटी ४५ लाखांवर पोहोचली आहे. मार्च २०१३ मध्ये नोंदणीकृत आयकरदात्यांची संख्या फक्त २ कोटी ७० लाख होती. मार्च २०१६ मध्ये ५ कोटी २० लाख आणि मार्च २०१७ मध्ये ही संख्या ६ कोटी २० लाख होती. कर आधार वाढविण्याबाबत सरकारने विचार करणे गरजेचे आहे. कर आधार वाढविल्याशिवाय मध्यावधी वृद्धीचा मार्ग जोखमीचा असेल, असे कोटक रिसर्चने म्हटले आहे.आयकरदात्यांची संख्या १.०५ कोटींवरनोंदणीकृत आयकरदात्यांनी विवरण दाखल करण्याचे प्रमाण २०१८-१९ मध्ये ७९ टक्के होते. त्याआधीच्या वित्तीय वर्षात हेच प्रमाण ९१.६ टक्के होते. आकडेवारीनुसार २०१८-१९ मध्ये पाच ते दहा लाखांदरम्यान उत्पन्न कर विवरण दाखल करणाºया आयकरदात्यांची संख्या वाढत १.०५ कोटींवर गेली. यात २०१८-१९ मधील १.०२ कोटी वैयक्तिक करदात्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :इन्कम टॅक्सभारत