Join us  

TATA च्या 'या' शेअरनं वर्षभरात दिला १०० टक्के नफा; Rakesh Jhunjhunwala यांचीही आहे मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 4:43 PM

TATA Shares Rakesh Jhunjhunwala Investment : २०२१ या वर्षांत अनेक कंपन्यांच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे.

२०२१ या वर्षांत अनेक कंपन्यांच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. काही कंपन्यांच्या शेअर्सनं दुपटीपेक्षाही अधिक झेप घेतली आहे. TATA Group देखील अशी एक कंपनी आहे जिनं वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना १०० टक्के नफा दिला आहे. शेअर बाजारातील (Share Market) बिगबुल असलेले राकेश झुनझुनवाला (Bigbull Rakesh Jhunjhunwala) यांचीदेखील या कंपनीत गुंतवणूक आहे.

टाटा समुहाच्या Titan Company Limited नं गुंतवणूकदारांची गुंतवणूक एका वर्षात दुप्पट केली आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या दरात १०९ टक्क्यांची वाढ झाली आहे आणि २०२१ च्या सुरूवातीपासून आतापर्यंत हा शेअर ५६ टक्क्यांनी वधारला आहे. सध्या या शेअरची किंमत २४२० रूपये इतकी आहे. टाटा समुहाची कंपनी टायटनचं मार्केट कॅप आता २ लाख कोटी रूपयांच्या वर गेलं आहे. जुलै ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा या कालावधीच्या तुलनेत २२२ टक्क्यांनी वाढून ६४१ कोटी रूपये झाला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला १७३ कोटी रूपयांचा नफा झाला होता.

टायटनच्या शेअर्सची ब्रोकरेज फर्म्सनं टार्गेट प्राईजही वाढवली आहे. सणासुदीच्या कालावधीत चांगली विक्री होण्यच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्म Macquarie नं याचं टार्गेट प्राईज २७८० रूपयांवरून वाढवून ३ हजार रूपये केलं आहे. शेअरखानच्या रिपोर्टनुसार टायटनकडे वर्किंग कॅपिटलही चांगलं आहे आणि सोन्याबाबत बदललेल्या काही नियमांनंतर नफाही वाढण्याची शक्यता आहे. शेअरखाननुसार २०२३-२४ मध्ये कंपनीचा कॅश फ्लो ४ हजार कोटी रूपये क्रॉस करू शकतो.

राकेश झुनझुनवाला यांच्या यासाठी टायटनचा हा शेअर्स चांगले रिटर्न देणारा ठरला आगे. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी मिळून कंपनीत आपला हिस्सा वाढवला आहे. सध्या दोघांकडेही मिळून कंपनीचा ४.८७ टक्के हिस्सा आहे.

टॅग्स :राकेश झुनझुनवालाशेअर बाजारटाटा