Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

By जयदीप दाभोळकर | Updated: November 26, 2025 14:40 IST

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यामुळे, आज, बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात याच्या किमतीत वाढ होत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीची मागणी वाढल्यामुळे, आज, बुधवार, २६ नोव्हेंबर रोजी सराफा बाजारात याच्या किमतीत वाढ होत आहे. २२ कॅरेट सोनं जीएसटीसह ११८,८८२ रुपये आणि १८ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९७,३३८ रुपये झालं. आज, २४ कॅरेट सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ८८५ रुपयांनी वाढून १२६,००४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

आता २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,२९,७८४ रुपये आहे. तर, चांदी जीएसटीसह प्रति किलो १,६२,५९१ रुपये आहे. आज ती १,५७,८५६ रुपये प्रति किलोवर उघडली, त्यात ३,३६९ रुपयांची वाढ झाली. मंगळवारी, जीएसटीशिवाय चांदी १,५६,३२० रुपये प्रति किलोवर बंद झाली आणि जीएसटीशिवाय सोनं १,२१,१९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झालं.

आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?

आता सोनं १७ ऑक्टोबरच्या १,३०,८७४ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून ४८७० रुपयांनी स्वस्त झालं आहे. तर, चांदीच्या किमती १४ ऑक्टोबरच्या १,७८,१०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून २०२४४ रुपयांनी कमी झाल्या आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता.

कॅरेटनुसार सोन्याचे भाव

आज, २३ कॅरेट सोने ८८१ रुपयांनी वाढून १,२५,४९९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. जीएसटीमुळे, त्याची किंमत आता १२९,२६३ रुपये झाली आहे, ज्यामध्ये मेकिंग चार्जेस वगळता.

२२ कॅरेट सोन्याची किंमत ८११ रुपयांनी वाढून १,१५,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाली, जीएसटीसह ते १,१८,८८२ रुपये झालंय.

१८ कॅरेट सोन्याचा भाव ६६४ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ९४,५०३ रुपये झाला आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९७,३३८ रुपये झाली.

१४ कॅरेट सोन्याचा भावही ५१७ रुपयांनी वाढला. तो आज ७३,७१२ रुपयांवर उघडला आणि आता जीएसटीसह ७५,९२३ रुपयांवर आला.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Surge Today: Check Rates Before Buying!

Web Summary : Gold and silver prices are up due to increased demand during the wedding season. Twenty-four carat gold is ₹1,29,784 per 10 grams (GST included), and silver is ₹1,62,591 per kg (GST included). Check latest rates before investing.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक