America On Russian Crude Oil Tariff On India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी एका कार्यकारी आदेशावर (Executive Order) स्वाक्षरी करून भारताकडून होणाऱ्या सर्व आयातीवरील २५% अतिरिक्त टॅरिफ हटवलं. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे ट्रम्प प्रशासनानं गेल्या वर्षी भारतावर हे टॅरिफ लादलं होतं. व्हाईट हाऊसनं या निर्णयाची पुष्टी केली असून रशियन तेल खरेदीमुळे लावलेली अतिरिक्त ड्युटी आता रद्द करण्यात आली असल्याचं म्हटलंय.
टॅरिफ हटवण्यामागील मुख्य अटी
व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार, भारतानं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रशियन फेडरेशनकडून तेल आयात करणं बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. यासोबतच भारताने अमेरिकन ऊर्जा उत्पादने खरेदी करण्याचा संकल्प केला असून, पुढील १० वर्षांसाठी संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी वॉशिंग्टनसोबत एका फ्रेमवर्कमध्ये एन्ट्री केली आहे. या अटींच्या पूर्ततेनंतरच २५% अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
रशियन तेल खरेदीबाबत इशारा
अतिरिक्त शुल्क हटवलं असले तरी, अमेरिकेने भारताला इशाराही दिला आहे. कार्यकारी आदेशानुसार, अमेरिका रशियन तेलाच्या आयातीबाबत भारतावर बारकाईनं लक्ष ठेवणार आहे. जर भारतानं पुन्हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रशियाकडून कच्च्या तेलाची आयात सुरू केली, तर प्रशासन हे अतिरिक्त टॅरिफ पुन्हा लागू करण्याचा विचार करू शकते, असं व्हाईट हाऊसनं स्पष्ट केलंय.
भारतीय उद्योगांसाठी मोठा दिलासा
ट्रम्प प्रशासनानं गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये रशियन तेल खरेदीचा ठपका ठेवत भारतावर २५% दंडात्मक शुल्क लादलं होतं. रशियन तेल खरेदी करून भारत युक्रेनमधील पुतिन यांच्या युद्धाला फडिंग करत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं होतं. या अतिरिक्त शुल्कामुळे भारतीय वस्तूंवरील एकूण अमेरिकन टॅरिफ ५०% पर्यंत पोहोचला होता, जो ब्राझीलसोबत जगातील सर्वाधिक होता. या प्रचंड शुल्कामुळे अमेरिकेला निर्यात करणाऱ्या भारतीय उद्योगांवर संकट ओढवलं होतं. मात्र, भारतानं रशियन तेलाची खरेदी लक्षणीयरीत्या कमी केल्याचे संकेत मिळाल्यानंतर आता हे टॅरिफ हटवण्यात आलेय.
Web Summary : US removes 25% tariff on Indian imports after assurances on Russian oil. India pledged to reduce Russian oil imports and increase cooperation with the US. Trump warns tariffs could return if India resumes Russian oil purchases.
Web Summary : अमेरिका ने रूसी तेल पर आश्वासन के बाद भारतीय आयात पर 25% टैरिफ हटाया। भारत ने रूसी तेल आयात कम करने और अमेरिका के साथ सहयोग बढ़ाने का वादा किया। ट्रंप ने चेतावनी दी कि रूसी तेल खरीदने पर टैरिफ फिर लग सकता है।