Join us  

उद्योगविश्वातील मोठी बातमी! रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 5:18 PM

२०२१ मध्येच अंबानी यांनी आता कंपन्यांची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपविली जाणार असल्याचे जाहीर केले होते. 

गेल्या काही वर्षांत टेलिकॉम क्षेत्रात मोठी झेप घेणाऱ्या रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा अब्जाधीश आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींनी राजीनामा दिला आहे. हा निर्णय २७ जूनपासून लागू झाला आहे. 

रिलायन्स जिओ इन्फोकॉमने याची आज माहिती दिली. याचबरोबर आकाश अंबानी यांना कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. इतर नियुक्त्यांमध्ये, पंकज मोहन पवार 27 जूनपासून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारतील. रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

२०२१ मध्येच अंबानी यांनी आता कंपन्यांची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपविली जाणार असल्याचे जाहीर केले होते. 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स जिओ