Petrol Diesel Excise Duty Cut: सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत सरकारनं शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्युटी) मोठी कपात केली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आता प्रति लिटर ३ रुपये झालं आहे, तर डिझेलवरील शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आलंय. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी रोखल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळा
विशेष म्हणजे, जगातील एकूण कच्च्या तेलाच्या आणि गॅस पुरवठ्यापैकी सुमारे २०% हिस्सा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जातो, जो दररोज २० ते २५ दशलक्ष बॅरलच्या दरम्यान असतो. युद्धापूर्वी भारत आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी सुमारे १२ ते १५ टक्के भाग याच मार्गावरून येणाऱ्या तेलाद्वारे पूर्ण करत होता. या दृष्टीनं भारतासाठी हा अत्यंत महत्त्वाचा पुरवठा मार्ग आहे. एका अंदाजानुसार, भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी ४० ते ५० टक्के हिस्सा, म्हणजेच दररोज २.२ ते २.८ दशलक्ष बॅरल ऐतिहासिकदृष्ट्या याच मार्गानं येत होतं.
उत्पादन शुल्कातील बदल आणि त्याचे परिणाम
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातील बदल थेट तुमच्या खिशावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करतात. उत्पादन शुल्क हा केंद्र सरकारकडून इंधनावर लावला जाणारा कर आहे. उत्पादन शुल्क वाढल्यास: तेल कंपन्या अनेकदा ही वाढ किमतींमध्ये समाविष्ट करतात, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महाग होतं. उत्पादन शुल्क कमी झाल्यास इंधनाच्या किमती कमी होतात, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळतो.
Web Summary : Big relief for consumers! The government slashed excise duty on petrol and diesel by ₹10 per liter. Petrol excise is now ₹3, diesel is zero. This move addresses global energy concerns amid the Iran-Israel conflict and potential Hormuz Strait disruptions, a key oil supply route for India.
Web Summary : उपभोक्ताओं के लिए बड़ी राहत! सरकार ने पेट्रोल और डीजल पर उत्पाद शुल्क में ₹10 प्रति लीटर की कटौती की। पेट्रोल पर उत्पाद शुल्क अब ₹3, डीजल पर शून्य है। यह कदम ईरान-इजरायल संघर्ष और संभावित होर्मुज जलडमरूमध्य व्यवधानों के बीच वैश्विक ऊर्जा चिंताओं को दूर करता है, जो भारत के लिए एक महत्वपूर्ण तेल आपूर्ति मार्ग है।