Join us

SBI क्रेडिट कार्ड युजर्सना मोठा झटका, १ एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 15:29 IST

SBI Credit Cards: एसबीआय कार्डन काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जे १ एप्रिल २०२५ पासून लागू केले जातील.

SBI Credit Cards: एसबीआय कार्डन आपल्या रिवॉर्ड पॉईंट्स प्रोग्राममध्ये काही बदल केले आहेत, जे १ एप्रिल २०२५ पासून लागू केले जातील. या बदलांमुळे काही ऑनलाइन व्यवहार आणि प्रवासाशी संबंधित खरेदीसाठी रिवॉर्ड पॉईंट्समध्ये कपात करण्यात आली आहे. हे बदल एसबीआय कार्ड, एअर इंडिया एसबीआय प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि एअर इंडिया एसबीआय सिग्नेचर क्रेडिट कार्ड युजर्ससाठी लागू असेल. जर तुम्ही कार्डधारक असाल तर तुम्हाला या बदलांची माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून ते या रिवॉर्ड पॉईंट्सचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतील.

स्विगीवर कमी रिवॉर्ड पॉईंट्स

१ एप्रिल २०२५ पासून सिम्पली क्लिक एसबीआय कार्डद्वारे स्विगीवर केलेल्या व्यवहारांवरील रिवॉर्ड पॉईंट्समध्ये कपात केली जाईल. पूर्वी कार्डधारकांना स्विगीवर खर्च केल्यास १०X रिवॉर्ड पॉईंट्स मिळत होते, मात्र आता ते ५X करण्यात आले आहे. मात्र हेच कार्ड अपोलो २४ बाय ७, बुक माय शो, क्लिअरट्रिप, डोमिनोज, आयजीपी, मिंत्रा, नेटमेड्स आणि यात्रा अशा काही ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर १०X रिवॉर्ड पॉईंट्स देत राहिल.

एसबीआय क्रेडिट कार्डनं एअर इंडियाच्या तिकिटाच्या खरेदीवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉईंट्समध्येही बदल केलेत. ३१ मार्ट २०२५ पासून एअर इंडियाची वेबसाईट किंवा मोबाइल अॅपद्वारे तिकीट खरेदी केल्यास एअर इंडिया SBI Platinum Credit आणि Air India SBI Signature Credit Card वर कमी रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील. याशिवाय SBI Platinum Credit Card वरील रिवॉर्ड पॉईंट्सही कमी करण्यात आलेत.

कॉम्प्लिमेंट्री इन्शुरन्स बंद

याशिवाय एसबीआय कार्डनं आपला कॉम्प्लिमेंट्री इन्शुरन्स बंद करण्याचा निर्णय घेतलाय. २६ जुलै २०२५ पासून कार्ड होल्डर्सना ५० लाखांचा अॅक्सिडेंटल इन्शुरन्स कव्हर आणि १० लाखांचा रेल्वे अॅक्सिडेंट इन्शुरन्स कव्हर देणं बंद केलंय.

टॅग्स :एसबीआय