Join us  

अदानींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा, सामाजिक कार्यांसाठी देणार साठ हजार कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 8:57 PM

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या ६० व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अदानी कुटुंबीयांनी मोठी घोषणा केली आहे.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या ६० व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अदानी कुटुंबीयांनी मोठी घोषणा केली आहे. अदानी कुटुंबाने सामाजिक कार्यासाठी ६०,००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. गौतम अदानी यांचे वडील शांतीलाल अदानी यांचेही हे वर्ष शताब्दी वर्ष आहे. अदानी फाऊंडेशनद्वारे हा निधी दिला जाणार आहे.

आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांसमोर आव्हानं कमी करण्यासाठी आणि ते उत्तम करण्यासाठी अदानी फाऊंडेशन काम करणार आहे. “हे वर्ष माझ्या वडिलांच्या १०० व्या जयंतीसोबतच माझ्या ६० व्या वाढदिवसाचं वर्षही आहे. याकडे पाहता अदानी कुटुंबानं सामाजिक कार्यासाठी ६० हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा वापर देशातील आरोग्य, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या कामांवर केला जाईल. अदानी कुटुंबाच्या या योगदानाचा उद्देश जे आमच्यासोबत विकासाच्या दिशेनं अदानी फाऊंडेशनसोबत मिळून बदल करण्याची इच्छा उराशी बाळगतात, अशा काही प्रतिभावंत लोकांना सोबत आणणं हा आहे,” अशी प्रतिक्रिया अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी दिली.

समाजासाठी एकत्र काम करूगौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची परोपकाराची बांधिलकी हे आपण काय करू शकतो याचे उदाहरण म्हणून घेतले पाहिजे. महात्मा गांधींच्या तत्त्वांनुसार आपल्या व्यावसायिक यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपण सर्वांनी धर्मादाय कार्यासाठी दान केले पाहिजे. आपल्या देशासमोर आव्हाने आहेत आणि शक्यताही आहेत, ज्या आपण सर्वांनी मिळून पूर्ण केल्या पाहिजेत. या महत्त्वपूर्ण प्रयत्नासाठी मी गौतम अदानी आणि त्यांच्या फाउंडेशनला माझ्या शुभेच्छा देतो,  अशी प्रतिक्रिया अझीम प्रेमजी फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि विप्रो लिमिटेडचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी दिली.

टॅग्स :अदानीअझिम प्रेमजी