Car Buying Guide : स्वतःची हक्काची कार असणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र, कार खरेदी करताना केवळ शो-ऑफ किंवा ईएमआयचा विचार करून चालत नाही. कार खरेदीचा निर्णय तुमच्या मासिक पगारावर अवलंबून असावा, अन्यथा कारचा हप्ता आणि देखभालीचा खर्च तुमचे महिन्याचे बजेट कोलमडवू शकतो.
जर तुमचा मासिक पगार ५०,००० रुपयांच्या आसपास असेल, तर साधारणपणे ७ ते १० लाख रुपयांपर्यंतची कार तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकते. बाजारात अशा काही लोकप्रिय कार उपलब्ध आहेत, ज्या तुमच्या खिशाला परवडणाऱ्या आणि वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत.
५० हजार पगार असणाऱ्यांसाठी ५ सर्वोत्तम पर्याय१. टाटा पंच : टाटा मोटर्सची ही मिनी एसयूवी सध्या भारतीय बाजारपेठेत प्रचंड गाजत आहे. सुरक्षेच्या बाबतीत ५-स्टार रेटिंग असलेल्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ५.५९ लाख रुपये आहे. यात सीएनजीचा पर्यायही उपलब्ध असल्याने इंधनाचा खर्चही वाचतो.
२. निसान मॅग्नाईट : जर तुम्हाला कमी किमतीत स्टायलिश आणि दणकट एसयूवी हवी असेल, तर निसान मॅग्नाईट हा एक उत्तम पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत ५.६१ लाख रुपयांपासून सुरू होते. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही एक किफायतशीर कार मानली जाते.
३. मारुती सुझुकी फ्रॉक्स : मारुतीची विश्वासार्हता आणि आधुनिक डिझाइनचा संगम म्हणजे 'फ्रॉक्स'. या कारची सुरुवातीची किंमत ६.८४ लाख रुपये आहे. मारुतीच्या कारचा रिसेल व्हॅल्यू आणि सर्व्हिसिंग खर्च कमी असल्याने ५० हजार पगार असलेल्यांना ही कार सहज परवडू शकते.
४. स्कोडा कायलाक : स्कोडाने नुकतीच आपली ही बजेट फ्रेंडली एसयूवी बाजारात आणली आहे. दर्जेदार बिल्ड क्वालिटी आणि प्रिमियम फीचर्स असलेल्या या कारची किंमत ७.५९ लाख रुपयांपासून सुरू होते. स्कोडाचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा एक 'बजेट फ्रेंडली' प्रवेश ठरू शकतो.
५. किया सिरोस : किया कंपनीने हाय-टेक फीचर्स आणि वेगळ्या लूकसाठी 'सिरोस' ही एसयूवी सादर केली आहे. याची एक्स-शोरूम किंमत ८.६७ लाख रुपये आहे. ज्यांचे मासिक उत्पन्न ५० हजार रुपये आहे आणि ज्यांना थोडी प्रिमियम कार हवी आहे, ते या पर्यायाचा विचार करू शकतात.
वाचा - आयटी कंपन्यांना संजीवनी! टेक महिंद्रा आणि इन्फोसिसची बाजाराला साथ; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
कार खरेदी करताना हे लक्षात ठेवाकेवळ गाडीची किंमत पाहून निर्णय घेऊ नका. मासिक हप्ता तुमच्या पगाराच्या १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. याव्यतिरिक्त पेट्रोल, विमा आणि वर्षाचा सर्व्हिसिंग खर्च यांचा विचार करूनच मॉडेल निश्चित करा.
Web Summary : Dreaming of a car with a ₹50,000 salary? Consider Tata Punch, Nissan Magnite, Maruti Fronx, Skoda, or Kia Sonet. These budget-friendly options offer great features and manageable EMIs. Remember to factor in maintenance costs before deciding.
Web Summary : ₹50,000 वेतन में कार का सपना? टाटा पंच, निसान मैग्नाइट, मारुति फ्रोंक्स, स्कोडा या किआ सोनेट देखें। ये बजट-अनुकूल विकल्प शानदार सुविधाएँ और प्रबंधनीय ईएमआई प्रदान करते हैं। निर्णय लेने से पहले रखरखाव लागतों पर विचार करना याद रखें।