Join us
Daily Top 2Weekly Top 5

३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 16:11 IST

वाहन कंपन्यांनी जीएसटी करकपातीचा थेट फायदा ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत मोठी कपात झाली आहे.

वाहन कंपन्यांनी जीएसटी करकपातीचा थेट फायदा ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. टाटा मोटर्स, हांदाई मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुझुकीसह सर्वच वाहन कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती ३० हजारांपासून ते ३०.४ लाखांपर्यंत कमी झाल्या आहेत. त्यामुळे या सणासुदीला कारच्या विक्रीत १० टक्के वाढ होण्याची शक्यता असल्यानं या क्षेत्राला बुस्टर मिळणार आहे.

कोणत्या कंपनीची किती कपात?

  • ह्युंदाई ७३,००० ते २,४०,०००
  • टोयोटा ६५,००० ते ३,४९,०००
  • टाटा मोटर्स ७५,००० ते १,५५,०००
  • महिंद्रा अँड महिंद्रा १,२७,००० ते १,५६,०००
  • किया मोटर्स ४८,००० ते ४,४९,०००
  • स्कोडा ६३,००० ते १,१९,००० 

PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?

कोणत्या वाहन कंपनीनं किती कमी केली किंमत ?

मारुती सुझुकी : 

मारुती सुझुकीनं आपल्या कारच्या किमतीत ४० हजार ते २ लाख २५ हजारांपर्यंत कपात केली आहे. वॅगनआरच्या किमतीत ५७ हजार, स्विफ्टमध्ये ५८ हजारांची कपात झाली आहे.

निसान मॅग्नाइट, रेनो :निसाननं आपल्या कारच्या किमतीत ५२ हजार ते ७६ हजार रुपयांची कपात केली आहे. रेनो कारच्या किमतीत ५३ हजार ते २६ हजार रुपयांची कपात केली आहे.

ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज अन् जग्वार : ऑडीनं ७ लाख ९३ हजारांपर्यंत बीएमडब्ल्यूने ९ लाखांपर्यंत, मर्सिडीज बेंझनं सहा लाखांपर्यंत तर जग्वारने ३०.४ लाखांपर्यंत कपात केली आहे.

टॅग्स :कारजीएसटीव्यवसाय