ePan Card Download Scam: जर तुमच्या ई-मेलवर ई-पॅन (e-PAN) कार्ड डाऊनलोड करण्याचा मेसेज आला असेल, तर सावध व्हा. केंद्र सरकारनं अशा ई-मेल्सबाबत लोकांना सतर्क केलंय. केंद्र सरकारची प्रेस एजन्सी 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो' (PIB) च्या फॅक्ट-चेक युनिटनं एका पोस्टद्वारे स्पष्ट केलंय की, ई-पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी पाठवले जात असलेले हे ई-मेल्स बनावट आहेत. अशा कोणत्याही ई-मेल, लिंक, कॉल किंवा एसएमएसला प्रतिसाद देऊ नका आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आपटले सोन्या-चांदीचे दर; पाहा तुमच्या शहरातील नवी किंमत
आयकर विभाग कधीही मागत नाही अशी माहिती
आयकर विभागाच्या नियमांनुसार, विभाग कधीही ई-मेलद्वारे तुमची वैयक्तिक माहिती, पिन नंबर, पासवर्ड किंवा बँक खाते/क्रेडिट कार्ड यांसारखी संवेदनशील माहिती मागत नाही. जर कोणी स्वतःला आयकर विभागाचा अधिकृत प्रतिनिधी सांगून अशी माहिती मागत असेल किंवा विभागाच्या वेबसाइटवर जाण्यास सांगत असेल, तर तो फसवणुकीचा प्रकार असू शकतो.
बनावट ई-मेल कसा ओळखावा आणि काय करू नये?
आयकर विभागानं अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या टीप्स दिल्या आहेत:
प्रतिसाद देऊ नका: अशा कोणत्याही संशयास्पद ई-मेलला उत्तर देऊ नका.अटॅचमेंट उघडू नका: ई-मेलसोबत आलेली कोणतीही फाईल डाऊनलोड करू नका, कारण त्यात व्हायरस किंवा 'मॅलेशियस कोड' असू शकतो, ज्यामुळे तुमचा कम्प्युटर हॅक होऊ शकतो.लिंकवर क्लिक करू नका: ई-मेलमधील कोणत्याही लिंकवर क्लिक करणं टाळा. सायबर गुन्हेगार या लिंक्स खऱ्या वाटतील अशा प्रकारे तयार करतात, मात्र त्या तुम्हाला बनावट वेबसाइटवर घेऊन जातात.कॉपी-पेस्ट टाळा: मेसेजमधील लिंक कॉपी करून ब्राउझरमध्ये पेस्ट करू नका. आपल्या डिव्हाइसमध्ये नेहमी अपडेटेड अँटी-व्हायरस आणि फायरवॉलचा वापर करा.
बनावट ई-मेल आल्यास काय करावं?
जर तुम्हाला आयकर विभागाच्या नावाखाली कोणताही संशयास्पद ई-मेल किंवा वेबसाइट आढळली, तर तो ई-मेल webmanager@incometax.gov.in वर फॉरवर्ड करा. याशिवाय त्याची एक प्रत incident@cert-in.org.in वर देखील पाठवू शकता. तक्रार नोंदवल्यानंतर तो ई-मेल तुमच्या इनबॉक्समधून त्वरित डिलीट करा.
Web Summary : The government warns against fake e-PAN download emails. Do not respond to suspicious emails asking for personal information. The Income Tax Department never asks for sensitive data via email. Report suspicious emails to webmanager@incometax.gov.in and incident@cert-in.org.in.
Web Summary : सरकार ने फर्जी ई-पैन डाउनलोड ईमेल के प्रति आगाह किया है। व्यक्तिगत जानकारी मांगने वाले संदिग्ध ईमेलों का जवाब न दें। आयकर विभाग कभी भी ईमेल के माध्यम से संवेदनशील डेटा नहीं मांगता है। संदिग्ध ईमेल की रिपोर्ट webmanager@incometax.gov.in और incident@cert-in.org.in पर करें।