Join us
Daily Top 2Weekly Top 5

आताच सावध व्हा! कमी पगाराच्या नोकऱ्या बंद होणार, तंत्रज्ञान एका हाताने हिसकावणार, दुसऱ्या हाताने देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 08:35 IST

जॉबचे गणित बदलणार; मुंबई, दिल्ली, बेंगळुरू रोजगाराचे ठरणार केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : येणाऱ्या दशकात देश आणि जगभरातील नोकरी क्षेत्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रात सध्या नोकऱ्यांची संधी दिसत आहेत तेथे येणाऱ्या दिवसांत घट होऊ शकते. या नोकऱ्यांची जागा नवीन क्षेत्र घेणार असून, तेथे नोकरी उपलब्ध होईल. 

कमी पगाराची नोकरी पुढील काळात संपणार असून, त्याची जागा तंत्रज्ञान घेऊ शकते. या तंत्रज्ञानाला चालवण्यासाठी नवीन क्षेत्र सुरू होऊ शकतात. वर्ल्ड इकोनॉमिक फोरमपासून अमेरिकेच्या ब्युरो ॲाफ लेबर स्टेटिक्ससह अनेक संस्थांनी ही शक्यता व्यक्त केली असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे.

यांच्या नोकऱ्या धोक्यात 

डेटा एंन्ट्री ॲापरेटर, क्लार्क, अकाउंटंट, कारखान्यातील कामगार, मेकॅनिक, रिलेशनशिप मॅनेजर, डोअर टू डोअर सेल्स वर्कर, प्रशिक्षण अधिकारी, बांधकामाशी संबंधित कामगार.

या नोकऱ्या वाढणारमार्केटिंग, साइट रिलाएबिलीटी इंजिनिअर, मॉलिक्युलर बायोलॉजिस्ट, वेलनेस स्पेशालिस्ट, यूझर एक्सपिरियन्स रिसर्चर, मशिन लर्निंग इंजिनिअर, रिक्रुटमेंट एसोसिएट, डेटा सायन्स स्पेशालिस्ट, चिफ लीगल ॲाफिसर, ई बिझनेस मॅनेजर, बँक एंड डेव्हलपर, मीडिया बायर्स, स्ट्रेटजी, एसोसिएट, बिझनेस डेव्हलपमेंट प्रतिनिधी, सेवा विश्लेषक

उद्योग व संधीचे शहरमार्केटिंग, जाहिरात, इंटरनेटनवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आयटी सर्विस, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर  बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नईरुग्णालय आणि हेल्थ केअर   मुंबई, बेंगळूरू, चेन्नईवेलनेस स्पेशालिस्ट    बेंगळुरू, मुंबई, नवी दिल्लीआयटी सेवा, डिझाइन      नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आयटी, कॉम्प्युटर सॉफ्टवेअरबेंगळुरू, मुंबई

आरोग्य क्षेत्र सर्वात गतीने वाढणारयेणार्या दशकभरात भारतात श्रमशक्तीमध्ये १४ टक्के वाढीचा अंदाज आहे. कृषी क्षेत्र सोडून अन्य क्षेत्रात वाढ पाहायला मिळेल. सर्वात जास्त दशभरातील वाढ आरोग्य क्षेत्रात पाहायला मिळेल. त्यानंतर आर्ट मॅनेजमेंट आणि वेलनेस या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज मॅकेन्जी ग्लोबल इन्स्टिट्यूटने म्हटले आहे.

रिमोट वर्क कल्चरला मर्यादाआगामी दशकात होणाऱ्या बदलांमध्ये रिमोट वर्क कल्चरमध्ये वाढ होईल. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबादमध्ये भाड्याने घेतलेली ॲाफिसची जागा कमी होत १.३७ कोटी वर्ग फूट झाली आहे. मात्र या वर्क कल्चरचा उपयोग मर्यादित क्षेत्रांसाठीच उपयोगी ठरू शकतो. कृषी आणि किरकोळ विक्री क्षेत्रात याचा वापर शक्य नाही.

टॅग्स :नोकरी