Join us

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 11 दिवस बँका राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2019 17:12 IST

ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती सोबतच  दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण असल्याने  11 दिवस बँक बंद असणार आहे.

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात गांधी जयंती सोबतच  दसरा, दिवाळी यांसारखे मोठे सण असल्याने  11 दिवस बँक बंद असणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात केवळ 20 दिवस बँकेंचे कामकाज चालणार असल्याने तुम्हाला बँकांची कामं लवकरच आटपावी लागणार आहे. तसेच आरबीआयने जाहीर केलेल्या ऑक्टोबर महिन्यातील 11 दिवसांच्या सुट्टींच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवारसह रविवारचा समावेश आहे. त्याचप्रमाणे  वेगवेगळ्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्याच्या या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. 

पुढील दिवशी बँका बंद राहतील:

2 ऑक्टोबर: आठवड्याच्या पहिल्या आठवड्यात गांधी जयंती असल्याने बँक बंद राहतील.

6 ऑक्टोबर: रविवार असल्याने बँका बंद असतील.

7  ऑक्टोबर: नवमी असल्याने बँकेचे काम बंद राहणार आहे.

8 ऑक्टोबर: दसरा असल्याने  बँका बंद असणार आहेत.

12  ऑक्टोबर: महिन्यातला दूसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहे.

 13 ऑक्टोबर: रविवार असल्याने बँका बंद असतील.

 20 ऑक्टोबरला: रविवार असल्याने बँका बंद राहणार आहे.

 26 ऑक्टोबर:  महिन्यातला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहे.

27 ऑक्टोबर: रविवार आणि दिवाळी असल्याने बँक बंद असतील.

28  ऑक्टोबर:  दिवाळीचा पाडवा असल्याने बँका बंद असणार आहेत.

29 ऑक्टोबर:  भाऊबीज असल्याने या दिवशीही बँकांना सुट्टी आहे.

टॅग्स :बँकभारतीय रिझर्व्ह बँक