लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या दीड दशकात बँकिंग सेवांमध्ये बरीच सुधारणा झाली असली तरी बँकांनी जवळजवळ प्रत्येक सेवेवर शुल्क लादल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. त्यातच आता बँका येत्या १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवून बँका ग्राहकांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. या निर्णयाचा फटका लाखो ग्राहकांना बसणार आहे.
सरकारी व खासगी बँकांनी अनेक नवीन सेवा शुल्क जाहीर केले आहेत, जे येत्या काही दिवसांत लागू होतील. एसबीआयने क्रेडिट कार्डसाठी नवीन शुल्क अटी जाहीर केल्या आहेत. आता रिवॉर्ड पॉइंट्सने खरेदी केलेल्या उत्पादनांवर किंवा व्हाउचरवर ९९ रुपये शुल्क भरावे लागेल.
एसबीआयचे शुल्क? वीज, फोन, गॅस इत्यादींसाठी ५०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पेमेंटवर १% शुल्क.कॉलेज, शाळेची फी भरण्यासाठी थर्ड-पार्टी ॲप किंवा वेबसाइटद्वारे केलेल्या पेमेंटवर १% शुल्क आकारले जाईल. मात्र, हे शुल्क शाळा किंवा महाविद्यालयात थेट केलेल्या पेमेंटवर लागू होणार नाही. डिजिटल वॉलेटमध्ये १,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास १% शुल्क आकारणार.
रात्री व्यवहार केल्यास वाढीव शुल्कएचडीएफसी बँक रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कॅश रिसायकलर मशीन्समध्ये जमा केलेल्या रोख रकमेवर सर्व खात्यांसाठी प्रति व्यवहार ५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारेल. हे दर १ नोव्हेंबरपासून लागू होतील. यामुळे कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर बोजा पडण्याची शक्यता जास्त आहे.
कोणत्या सेवेसाठी किती शुल्क? डुप्लिकेट पासबुक १०० रुपये,एंट्रीसह डुप्लिकेट पासबुक ५० रुपये प्रति पेजअतिरिक्त चेक पेमेंट थांबवणे २०० रुपये प्रति चेकग्राहकाच्या चुकीमुळे चेक परत येणे १५० रुपयेस्वाक्षरी सत्यापन १०० रुपयेसंयुक्त बँक खात्यात स्वाक्षरी पडताळणी १५० रुपयेडिमांड ड्राफ्ट (५ ते १० हजार) ७५ रुपयेपोस्टल शुल्क ५० ते १०० रुपयेरोख रक्कम काढणे (५ वेळा नंतर) ७५ रु. प्रत्येकवेळीखाते देखभाल शुल्क ५०० रुपयेएसएमएस अलर्ट १० ते ३५ रुपये प्रति तिमाहीमोबाईल नंबर, ईमेल आयडी बदलणे ५० रु.+ जीएसटीडेबिट कार्ड देखभाल शुल्क २५० ते ८०० रुपयेडेबिट कार्ड री-पिन बदलणे २५ ते ५० रुपये
Web Summary : Banks are set to increase online service fees from November 1st, impacting millions. New charges include fees for reward redemptions, high-value payments, digital wallet deposits, and nighttime cash deposits. Other fees apply to duplicate passbooks, check-related services, and SMS alerts.
Web Summary : बैंक 1 नवंबर से ऑनलाइन सेवा शुल्क बढ़ाने के लिए तैयार हैं, जिससे लाखों प्रभावित होंगे। नए शुल्कों में इनाम रिडेम्पशन, उच्च-मूल्य भुगतान, डिजिटल वॉलेट जमा और रात में नकद जमा पर शुल्क शामिल हैं। अन्य शुल्क डुप्लिकेट पासबुक, चेक-संबंधित सेवाओं और एसएमएस अलर्ट पर लागू होते हैं।