Join us

अलर्ट! लवकर आटपून घ्या महत्त्वाची कामे; जानेवारीमध्ये १४ दिवस बँका राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2020 12:06 IST

पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहील. आरबीआयने सन २०२१ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे.

ठळक मुद्देजानेवारी २०२१ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहणार'आरबीआय'कडून सुट्ट्यांची यादी जाहीरजानेवारी २०२१ मध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांसह शनिवार, रविवारचा समावेश

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच म्हणजे जानेवारी महिन्यात बँका तब्बल १४ दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) सन २०२१ मध्ये बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२१ मध्ये बँकांचे कामकाज १४ दिवस बंद राहील.

जानेवारी महिन्यात बँकांची कामे उरकण्यासाठी केवळ १७ दिवस ग्राहकांना मिळणार असून, बँकांच्या १४ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवार यांचाही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय सुट्ट्या आणि राज्यांनुसार सुट्ट्यांचा समावेश आहे. त्यामुळे बँकांशी निगडीत असलेली कामे लवकरात लवकर उरकून घ्यावीत. अन्यथा काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे. बँकांचे कामकाज बंद राहणार असले, तरी मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग सेवा सुरू राहणार असल्याचे रिझर्व्ह बँकेकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

जानेवारी २०२१ मधील बँकांच्या सुट्ट्या 

०१ जानेवारी - नवीन वर्ष 

०२ जानेवारी - शनिवार आणि नववर्षाचे स्वागत

०३ जानेवारी - रविवार

०९ जानेवारी - दुसरा शनिवार

१० जानेवारी - रविवार

१४ जानेवारी - मकरसंक्रांत आणि पोंगल

१५ जानेवारी - तिरुवल्लुवर दिवस

१६ जानेवारी - उझावर थिरुनल

१७ जानेवारी - रविवार

२३ जानेवारी - चौथा शनिवार

२४ जानेवारी - रविवार

२५ जानेवारी - इमोइनू इरतपा

२६ जानेवारी -  प्रजासत्ताक दिन

३१ जानेवारी - रविवार

 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकनववर्षभारतीय रिझर्व्ह बँक