Bank Holidays in April : एप्रिल महिना संपायला आता काही दिवस उरले आहेत. मे महिन्याची सुरुवात होण्याआधी तुम्ही बँकेतील काही कामे संपवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. अनेकदा आपण बँकेत पोहचतो आणि कळतं की आज बँक बंद आहे. अशी गैरसोय टाळण्यासाठी तुमच्या परिसरातील बँकांना कधी सुट्टी आहेत, हे माहिती असणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या कॅलेंडरनुसार, उद्यापासून ३० तारखेपर्यंत पुढील ४ दिवस विविध कारणांमुळे बँका बंद राहतील. या बँक सुट्ट्या सर्व बँकांमध्ये लागू होणार नाहीत. त्यामुळे तुमच्या बँकेचं यात नाव आहे का? हे तपासून घ्या.
रिझर्व्ह बँकेने जाहीर केली सुट्ट्यांची यादीउद्या म्हणजेच २६ एप्रिल रोजी चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या नियमांनुसार, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देशभरातील बँका बंद राहतील. त्यामुळे या दिवशी सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील. यानंतर, २७ एप्रिल रोजी रविवारची सुट्टी असल्याने बँका बंद राहतील. ही बँकेची नियमित साप्ताहिक सुट्टी आहे. या दिवशीही देशभरातील सर्व बँका बंद राहतील.
सोमवारी या राज्यातील बँका बंद राहतीलयानंतर, २८ एप्रिलला सोमवार येतो. या दिवशी बँका काम करतील. पण, दुसऱ्या दिवशी २९ एप्रिल रोजी परशुराम जयंती आहे. आरबीआय कॅलेंडरनुसार या दिवशी हिमाचल प्रदेशात बँका बंद राहतील. हिमाचल प्रदेशात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी फक्त हिमाचल प्रदेशातील बँका बंद राहतील, तर उर्वरित राज्यांमध्ये बँका खुल्या राहण्याची अपेक्षा आहे.
बसव जयंती आणि अक्षय्य तृतीयाकर्नाटकात ३० एप्रिल रोजी बसव जयंती आणि अक्षय्य तृतीयेमुळे बँका बंद राहतील. बसव जयंती हा कर्नाटकातील मोठा सण आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी कर्नाटकातील सर्व बँका बंद राहतील. परंतु, उर्वरित राज्यातील बँका नेहमीप्रमाणे कार्यरत राहतील.
वाचा - १ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
सर्रास सर्व बँका बंद राहणार नाहीतमहिना अखेरीस २६ ते ३० एप्रिल या कालावधीत बँका ४ दिवस बंद राहणार असल्याची तरी सर्व बँका बंद राहतील असे नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणांमुळे सुट्ट्या असतात. जर तुम्हीही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर प्रथम तुमच्या बँकेच्या शाखेची माहिती घ्या. यासाठी तुम्ही बँकेच्या वेबसाइट किंवा कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता.