Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे लागोपाठ 5 दिवस बँका आणि ATM राहणार बंद, आताच करून ठेवा पैशांची व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 16:05 IST

गेल्या आठवड्यात 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान लागोपाठ दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.

ठळक मुद्देगेल्या आठवड्यात 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान लागोपाठ दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता.सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारल्यास मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ATM आणि बँकिंग सेवा 5 दिवसांसाठी प्रभावित होणार आहेत. 11 मार्च ते 13 मार्च असे लागोपाठ 3 दिवस बँक कर्मचारी संपाची घोषणा करू शकतात.

नवी दिल्लीः गेल्या आठवड्यात 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारीदरम्यान लागोपाठ दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. आता बँक कर्मचारी पुन्हा एकदा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप पुकारल्यास मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ATM आणि बँकिंग सेवा 5 दिवसांसाठी प्रभावित होणार आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना पैशांची चणचण भासू शकते. बँक एम्प्लॉई फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक एम्पलॉई असोसिएशन (AIBEA)च्या माहितीनुसार, 11 मार्च ते 13 मार्च लागोपाठ 3 दिवस बँक कर्मचारी संपाची घोषणा करू शकतात.बँक कर्मचाऱ्यांचं वेतन वाढवण्याच्या मागणीसंदर्भात इंडिया बँक असोसिएशन(IBA)बरोबर झालेली चर्चा यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे संप पुकारल्यास लागोपाठ 5 दिवस बँकांच्या सेवा प्रभावित होऊ शकतात. हा संप मार्च महिन्याच्या दुसऱ्या शनिवारच्या आधी घोषित केला जाणार आहे. अशातच रविवार पकडून 5 दिवस बँकांची सेवा प्रभावित होणार आहे. परंतु ICICI बँक आणि HDFC बँकांच्या कामकाजावर याचा कोणताही प्रभाव पडणार नाही.तत्पूर्वी 8 जानेवारीला सरकारच्या धोरणांना विरोध करत कर्मचारी संघटनांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं. सरकारनं आमच्या मागण्या मान्य न केल्यास 1 एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी आम्ही संपावर जाऊ, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार, 5 वर्षांनी त्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात याव्यात. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात शेवटी 2012मध्ये सुधारणा करण्यात आली होती. वर्षं 2017पर्यंत यात कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नव्हती. 

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र