Join us

Banking News: नऊ लाख कोटींची बलाढ्य बँक, कोणत्या बँकेचे बाजारमूल्य किती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 11:43 IST

Banking News: गृहकर्जाच्या क्षेत्रात अग्रेसर  असलेली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँक या खासगी क्षेत्रातल्या दोन भक्कम वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या बातमीने गेला  आठवडा गाजला.

गृहकर्जाच्या क्षेत्रात अग्रेसर  असलेली एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँक या खासगी क्षेत्रातल्या दोन भक्कम वित्तीय संस्थांच्या विलीनीकरणाच्या बातमीने गेला  आठवडा गाजला. या विलीनीकरणामुळे अस्तित्वात येणाऱ्या एचडीएफसी बँकेचे बाजारमूल्य तब्बल ९ लाख ८ हजार ६३७ कोटी रुपये इतके महाप्रचंड असणार आहे. देशातल्या बँकिंग क्षेत्राची एकूण अवस्था दयनीय असताना झालेल्या एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी  बँकेच्या  या विलीनीकरणाने आर्थिक व्यवस्थापनातल्या शिस्तीचे अनेक धडे घालून दिले आहेत. भारतातल्या सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या बँकांच्या  एकूण बाजारमूल्याची तुलना सोबत आहे  

टॅग्स :बँकबँकिंग क्षेत्र