Join us

Bank Union Strike : मोठी बातमी! देशभरातील बँका दोन दिवस बंद राहणार! महत्त्वाची कामे आधीच उरकून घ्या, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 15:18 IST

Bank Strike Bank Holidays February 2022 : देशातील सरकारी बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला दोन दिवसीय बँक संपावर जाणार आहेत.

नवी दिल्ली : आरबीआयने जारी केलेल्या फेब्रुवारीमधील बँक सुट्ट्यांनुसार (Bank Holidays in February), या महिन्यात एकूण 9 दिवस बँका बंद राहतील. मात्र, या सुट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. फेब्रुवारीमध्येही बँकांचा संप असून, त्यामुळे बँकांचे कामकाज दोन दिवस ठप्प राहणार आहे.

देशातील सरकारी बँक कर्मचारी 23 आणि 24 फेब्रुवारीला दोन दिवसीय बँक संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU-United Forum of Bank Unions) यासंदर्भातील माहिती दिली आहे. बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ हा संप करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात दोन बँकांचे खाजगीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर बँकांचे खाजगीकरण करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे.

काय आहे संपाचे कारण?विशेष म्हणजे, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशनने (AIBOC)  सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाविरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. केंद्र सरकारकडून निर्गुंतवणुकीवर स्थापन केलेल्या सचिवांच्या मुख्य समुहाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ इंडिया या बँकाचे नाव सुचवले होते.

खाजगीकरणापूर्वी कर्मचाऱ्यांचे काय?मीडिया रिपोर्ट्सनुसार, खाजगीकरणापूर्वी या बँका आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना (VRS) घेऊ शकतात. म्हणजेच कर्मचाऱ्यांसाठीही हा चिंतेचा विषय आहे.

'या' दिवशी बँका बंद राहणार; आरबीआयनुसार सुट्ट्यांची यादी!12 फेब्रुवारी: महिन्याचा दुसरा शनिवार13 फेब्रुवारी : रविवार15 फेब्रुवारी : मोहम्मद हजरत अली जन्मदिवस/लुई-नगाई-नी (इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँका बंद)16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद)18 फेब्रुवारी: डोलजात्रा (कोलकात्यामध्ये बँका बंद)19 फेब्रुवारी: छत्रपती शिवाजी महाराज जयंती (बेलापूर, मुंबई, नागपूर येथे बँका बंद)20 फेब्रुवारी: रविवार26 फेब्रुवारी: महिन्याचा चौथा शनिवार27 फेब्रुवारी : रविवार

टॅग्स :बँकसंप