Join us  

ATMमधून ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास बँक देणार पॅनल्टी; जाणून घ्या, नवीन नियम...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:54 AM

..तर ग्राहक बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकतात.

नवी दिल्ली : एटीएममधून पैसे बाहेर येण्याआधीच पैसे आपल्या खात्यातून कापले जातात. असा अनुभव अनेकांना आला असेलच. मात्र, आता याबाबत घाबरायचं काही कारण नाही. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांच्या फेल्ड ट्रान्झॅक्शनसंबंधी तक्रारी लक्षात घेत टर्न अराउंड टाइम (TAT) एक निश्चित कालावधी तयार केला आहे. या नियमानुसार, ट्रान्झॅक्शन फेल्ड झाल्यास बँक एका निश्चित कालावधीत ग्राहकांचे सेटलमेंट करणार, जर असे नाही केल्यास बँकेला ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.  

रिझर्व्ह बँकेने पैशांची देवाण-घेवाण आठ वेगवेळ्या वर्गात विभागली आहे. यात एटीएममधून देवाण-घेवाण, कार्डवरून देवाण-घेवाण, तात्काळ पेमेंट सिस्टिम, युनिफाइड पेमेंट इंटरफेस आणि प्रीपेड कार्ड यांचा समावेश आहे. नवीन नियमानुसार, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पाच दिवसांत बँकेला ग्राहकांच्या खात्यात पैसे परत करावे लागणार आहेत.

जर पैसे ठरलेल्या कालावधीत बँकेने परत केले नाहीत तर ग्राहकाला दररोज 100 रुपये नुकसान भरपाई म्हणून बँकेला द्यावे लागणार आहे. तसेच, ज्या ग्राहकांचे TAT नुसार तक्रार करूनही समाधान झाले नसेल. तर ते ग्राहक बँकिंग लोकपालकडे तक्रार करू शकतात. 

नवे नियम...

ATM Transaction : जर ATM ट्रान्झॅक्शनमध्ये खात्यावरून पैसे कापले जातात. मात्र, पैसे मिळत नाहीत. तर ट्रान्झॅक्शननंतर 5 दिवसांत खात्यावर पैसे परत आले पाहिजे. जर 5 दिवसांहून ( T+5) जास्त वेळ लागत असेल तर ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून 100 दररोज बँकेला द्यावे लागणार आहेत. 

IMPS Transaction : खात्यातून पैसे कापले. मात्र, रिसीव्हरच्या खात्यात गेले नाहीत. तर बँकेला ट्रान्झॅक्शनच्या एक दिवसानंतर पैसे परत करावे लागणार आहे. जर असे झाले नाही तर दुसऱ्या दिवसांपासून दररोज 100 रुपये नुकसान भरपाई बँकेला द्यावी लागणार आहे. कार्डवरून कार्डवर ट्रान्सफर : एका कार्डवरून दुसऱ्या कार्डवर पैसे पाठविताना एका कार्डमधील पैसे कापले गेले. मात्र, दुसऱ्या कार्डवर पैसे ट्रान्सफर झाले नाहीत. तर ट्रान्झॅक्शननंतर जास्त तर एक दिवसानंतर (T+1) रिव्हर्सल ट्रान्जक्शनच्या दुसऱ्या दिवसापासून 100 रुपये दररोज बँकेला नुकसान भरपाई म्हणून ग्राहकाला द्यावे लागणार आहेत. 

UPI वरून पैसे पाठविणे : असे समजा की आपल्या खात्यातून पैस कापले. मात्र, तुम्ही ज्यांना पाठविले त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तर ट्रान्झॅक्शनच्या एक दिवसाच्या (T+1) आत पैसे परत करावे लागणार आहेत. बँकेने नाही केल्यास दुसऱ्या दिवसांपासून 100 रुपये दररोज नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. तसेच,  जर UPI मधून मर्चेंट पेमेंटवर खात्यातून पैसे कापले आणि मर्चेंटपर्यंत पोहोचले नाही तर  T+5 दिवसांत रिव्हर्सल करावे लागणार आहेत. जर वेळेत ऑटो रिव्हर्स नाही झाले तर 100 रुपये दररोज बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. 

PoS वरून ट्रान्जक्शन : खात्यातून पैसे कापले. मात्र मर्चेंटला रक्कमेचे कंफर्मेशन नाही आले. तर ट्रान्जक्शन 5 दिवसाच्या आत (T+5) कापण्यात आलेली रक्कम परत करावी लागणार आहे. तसे झाले नाही तर ट्रान्झॅक्शननंतर सहाव्या दिवसापासून रोज 100 रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून आधार पे च्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. 

टॅग्स :एटीएमव्यवसायबँकपैसाभारतीय रिझर्व्ह बँक