Join us

Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:13 IST

Bank Locker Charges : जर तुम्ही बँकेचं लॉकर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांनी नोव्हेंबरपासून लॉकर शुल्कात बदल केला आहे. न

Bank Locker Charges : जर तुम्ही बँकेचं लॉकर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील अनेक मोठ्या बँकांनी नोव्हेंबरपासून लॉकर शुल्कात बदल केला आहे. नव्या बदलानंतर लॉकरच्या भाड्यात वाढ झाली आहे. लॉकरचं भाडं त्याच्या आकारावर आणि शाखेच्या स्थानावर (मेट्रो, शहरी, निमशहरी, ग्रामीण) अवलंबून असतं. याशिवाय लॉकरसाठी रजिस्ट्रेशन चार्ज आणि १८ टक्के जीएसटीही भरावा लागतो. बँक तुम्हाला वर्षाच्या ठराविक मर्यादेत मोफत व्हिजिट देते, मर्यादेनंतर तुम्हाला प्रत्येक व्हिजिट स्वतंत्र चार्ज + जीएसटी भरावा लागतो.

फ्री व्हिजिटची मर्यादा

रजिस्ट्रेशन आणि फ्री व्हिजिटची मर्यादा प्रत्येक बँकेत वेगळी असू शकते. बँक लॉकरचे स्वतःचे फायदे आहेत, जिथे आपण आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवू शकता. त्यामुळेच मेट्रो आणि शहरी भागात लॉकरला मोठी मागणी आहे. जाणून घेऊया सध्या कोणती बँक लॉकरसाठी किती शुल्क आकारत आहे.

एसबीआय बँक

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय मेट्रो आणि शहरी भागात लहान आकाराच्या लॉकरसाठी २००० रुपये, मध्यम आकाराच्या लॉकरसाठी ४००० रुपये, मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी ८००० रुपये आणि अती मोठ्या आकाराच्या लॉकर १२,००० रुपये आकारत आहे. याशिवाय निमशहरी आणि ग्रामीण भागात बँक लहान आकाराचे लॉकर १५०० रुपये, मध्यम आकाराचे लॉकर ३००० रुपये, मोठ्या आकाराचे लॉकर ६००० रुपये आणि अती मोठ्या आकाराचे लॉकर ९००० रुपयांना भाड्यानं देत आहे.

पंजाब नॅशनल बँक

सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आपल्या ग्राहकांना शहरी आणि मेट्रो ठिकाणी लहान आकाराच्या लॉकरसाठी २००० रुपये, मध्यम आकाराच्या लॉकरसाठी ३५०० रुपये, मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी ५५०० रुपये, खूप मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी ८००० रुपये आणि अती मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी १०,००० रुपये वार्षिक भाडं आकारत आहे. 

टॅग्स :बँकएसबीआयपंजाब नॅशनल बँक