Join us

बँक ऑफ बडोदाने सुरू केली व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवा; ग्राहकांना होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 12:44 IST

Bank of Baroda : बँकिंग सेवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध असतील.

ठळक मुद्देजे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते सुद्धा या प्लॅटफॉर्मद्वारे बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर, एटीएम आणि शाखांविषयी माहिती घेऊ शकतात.

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवरबँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अकाउंट बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस माहिती, चेकबुकसाठी विनंती, डेबिट कॉर्ड ब्लॉक करणे आणि उत्पादने व सेवांविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आम्हाला वाटते की व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना बर्‍याच सुविधा मिळतील आणि ते आपल्या बँकिंग गरजा भागवू शकतील, बँकेचे कार्यकारी संचालक ए के खुराना यांनी एका निवेदनात म्हटले आहे. बँकिंग सेवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध असतील. यासाठी अतिरिक्त अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही. तसेच, जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते सुद्धा या प्लॅटफॉर्मद्वारे बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर, एटीएम आणि शाखांविषयी माहिती घेऊ शकतात.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकेने मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून देऊ केलेल्या सेवा वाढवण्याची घोषणा केली होती. आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवरुन फिक्स्ड डिपॉझिट (एफडी), युटिलिटी बिले भरणे आणि ट्रेड फायनान्स तपशिलावर त्वरित प्रवेश करता येईल, असे बँकेने म्हटले होते. आयसीआयसीआय बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून या सेवा देणारी ही इंडस्टीतील पहिली बँक बनली आहे. या नव्या सेवांद्वारे व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना देऊ केलेल्या बँकिंग सेवांची संख्या 25 वर पोहोचली असल्याचे बँकेने म्हटले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगचे फायदे :-आपल्या मोबाईलमध्ये आयसीआयसीआय बँकेचा व्हेरिफाइड व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल नंबर '86400 86400' हा सेव्ह करा. आता आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून बँकेच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर 'हाय' पाठवा. यानंतर बँकेतून उपलब्ध असलेल्या सेवांची यादी प्राप्त होईल. सेवांच्या लिस्टमधून आपल्या आवश्यकतेनुसार 'कीवर्ड' टाईप करा आणि रिप्लाय करा. त्यानंतर आपण त्वरित त्या सेवेचा लाभ घेऊ शकता. 

टॅग्स :बँकव्हॉट्सअ‍ॅपतंत्रज्ञानव्यवसाय