Join us  

'या' बँकेत तुमचे खाते असल्यास दरमहा 28 रुपये जमा करा, मिळेल  4 लाखांचा फायदा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 3:08 PM

Bank of Baroda : 4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.

नवी दिल्ली : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) आपल्या ग्राहकांना अनेक फायदे देत आहे. असे बरेच ग्राहक आहेत ज्यांना याबद्दल माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत की, तुम्ही दरमहा फक्त 28.5 रुपये जमा करून पूर्ण 4 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकता. जाणून घ्या, बँकेच्या या योजनेबद्दल सर्वकाही ...

बँक देत आहे 4 लाख रुपयांची 'ही' सुविधा4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. या योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहेत. या योजनांमध्ये गुंतवणूकीची रक्कम खूप कमी आहे. या दोन योजनांमध्ये, फक्त 342 रुपये वार्षिक जमा करावे लागतात, म्हणजेच फक्त 28 रुपये दरमहा.

PMJJBY फक्त 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाख फायदाप्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेअंतर्गत व्यक्तीला जीवन संरक्षण मिळते. विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana PMSBY) अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा प्रदान करते. पीएमएसबीवाय ही केंद्र सरकारची एक योजना आहे, ज्या अंतर्गत खातेधारकाला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

जनधन खाताधारकांना मोफत मिळत आहे, 2 लाखांचा फायदादरम्यान, ही सुविधा जन धन ग्राहकांना बँकेने दिली आहे. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा संरक्षणाची सुविधा पुरवत आहे.

अटल पेन्शन योजनाकमी गुंतवणुकीवर पेन्शनच्या हमीसाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana)सुरू केली आहे. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपयांच्या पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेमध्ये 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

टॅग्स :पैसाव्यवसाय