Join us
Daily Top 2Weekly Top 5

Aadhaar News: आधार फोटोकॉपीवर बंदी... लवकरच येणार कडक नियम, नक्की काय आहे सरकारचा प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 11:10 IST

Aadhaar News: सरकार आता हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर, सलॉन, ऑफिस एंट्री गेट यांसारख्या ठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी मागण्याची प्रथा पूर्णपणे बंद करणार आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लॅन आणि काय होणार फायदा.

Aadhaar News: सरकार आता हॉटेल, इव्हेंट ऑर्गनायझर, सलॉन, ऑफिस एंट्री गेट यांसारख्या ठिकाणी आधार कार्डची फोटोकॉपी मागण्याची प्रथा पूर्णपणे बंद करणार आहे. म्हणजेच, यापुढे कोणीही तुमच्या आधारची कॉपी फाईलमध्ये ठेवून जमा करणार नाही. डेटा लीक होण्याची चिंता संपुष्टात यावी आणि ओळख पटवण्यासाठी केवळ क्यूआर स्कॅन किंवा ॲपद्वारे पडताळणी व्हावी, यासाठी सरकार हे पाऊल उचलत आहे.

यूआयडीएआयचे सीईओ भुवनेश कुमार यांनी माहिती दिली की, या नवीन नियमाला मंजुरी देण्यात आली असून तो लवकरच नोटिफाय केला जाईल. नवीन प्रणालीमध्ये हॉटेल किंवा इव्हेंटवाले त्यांची ओळख नोंदणी करतील आणि त्यांना एक टेक्निकल इंटरफेस मिळेल, ज्याद्वारे ते कोणत्याही कागदपत्रांशिवाय फक्त क्यूआर स्कॅन किंवा नवीन आधार ॲप वापरून ओळख पटवू शकतील. हा बदल संपूर्ण पडताळणी प्रक्रिया जलद, खासगी आणि पूर्णपणे पेपरलेस करेल.

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; निफ्टी ५० अंकांनी घसरला, Indigo चा शेअर आपटला

आता फोटोकॉपीचा जमाना संपणार

अनेक हॉटेल किंवा इव्हेंटवाले आजही आधारची फोटोकॉपी मागून ती फिजिकल फाईलमध्ये ठेवतात. हे थेट आधार ॲक्टच्या विरोधात आहे आणि डेटा सुरक्षेसाठीही धोकादायक आहे. नवीन नियम लागू झाल्यावर कोणतीही संस्था पेपर-आधारित आधार पडताळणी करू शकणार नाही. प्रत्येकाला नोंदणी करून क्यूआर स्कॅन पद्धत वापरावी लागेल.

यूआयडीएआय एक नवीन ॲप तपासत आहे, जे ॲप-टू-ॲप ओळख करेल. यामुळे प्रत्येक वेळी आधारच्या सेंट्रल सर्व्हरशी जोडणी करण्याची गरज भासणार नाही. अनेकदा सर्व्हर डाउन झाल्यामुळे हॉटेल चेक-इन किंवा इव्हेंट एंट्रीमध्ये विलंब होत होता. आता ही अडचण दूर होईल. जिथे क्यूआर स्कॅन असेल, तिथे तत्काळ ओळख पटेल. हे ॲप विमानतळ, दारूची दुकानं किंवा ज्या ठिकाणी वय किंवा ओळख पडताळणी आवश्यक आहे, अशा ठिकाणीही वापरलं जाऊ शकेल.

डेटा प्रायव्हसीला मिळणार बळ

कोणत्याही नागरिकाची आधार माहिती कुठेही कॉपी करून ठेवली जाऊ नये, हे सुनिश्चित करण्यावर सरकारचं लक्ष आहे. क्यूआर स्कॅनमध्ये फक्त नाव आणि फोटो यांसारखे मूलभूत तपशील दिसतात, संपूर्ण माहिती नाही. यामुळे ओळखही होईल आणि डेटा लीक होण्याची भीतीही राहणार नाही.

डीपीडीपी ॲक्टनुसार संपूर्ण प्रणाली अपग्रेड होणार

हे नवीन ॲप डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्टच्या (DPDP Act) अनुषंगाने तयार केलं जात आहे. पुढील १८ महिन्यांत हा ॲक्ट पूर्णपणे लागू होईल, त्यामुळे यूआयडीएआय आधीपासूनच संपूर्ण आधार प्रणाली अद्ययावत करत आहे. ॲपमध्ये पत्ता अद्ययावत करण्याचा पर्यायही असेल आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही, अशा लोकांनाही कुटुंबाच्या एका ॲपमध्ये जोडता येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Aadhaar Photocopy Ban: Stricter Rules Coming, Government's Plan Explained

Web Summary : Aadhaar photocopies banned at hotels, events. QR scans, app verification replace physical copies, preventing data leaks. UIDAI to notify new rules soon. App-based verification will enhance privacy and streamline identity checks, aligning with DPDP Act.
टॅग्स :आधार कार्डसरकार