Join us

बजाज नोमार्क हॅण्ड सॅनिटायझर बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 00:19 IST

कोरोना व्हायरसचा होत असलेला प्रसार पाहता जंतूंपासून संरक्षण करणाऱ्या विविध उत्पादनांना मागणी वाढली आहे. याच कालावधीमध्ये बजाज कन्झुमर केअर या कंपनीने हा नवीन हॅण्ड सॅनिटायझर बाजारात आणला आहे.

मुंबई : पाणी आणि साबणाचा वापर न करता नागरिकांना जंतूंपासून संरक्षण मिळवून देणारा बजाज नोमार्क हॅण्ड सॅनिटायझर नुकताच बाजारामध्ये दाखल झाला आहे. या माध्यमातून बजाज कन्झुमर केअर ही कंपनी वैयक्तिक स्वच्छता या प्रकाराची प्रॉडक्ट घेऊन आली आहे.देशामध्ये कोरोना व्हायरसचा होत असलेला प्रसार पाहता जंतूंपासून संरक्षण करणाऱ्या विविध उत्पादनांना मागणी वाढली आहे. याच कालावधीमध्ये बजाज कन्झुमर केअर या कंपनीने हा नवीन हॅण्ड सॅनिटायझर बाजारात आणला आहे.कडुनिंब आणि कोरफड यांच्यापासून हा हॅण्डवॉश बनविण्यात आला असून, पाणी आणि साबणाचा वापर न करताही यापासून जंतूंपासून संरक्षण उपलब्ध होणार आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुमित मल्होत्रा यांनी सांगितले की, नागरिकांनी निरोगी आणि जंतूंपासून मुक्त राहावे, या हेतूने हे प्रॉडक्ट आम्ही बाजारात आणले आहे. (वा.प्र.)

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या