Join us  

२०२५ मध्ये CNG वर चालणारी बाइक लाँच करणार, पाहा काय म्हणाले कंपनीचे CEO राजीव बजाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:09 AM

टू व्हिलर इंडस्ट्री गरजेपेक्षा अधिक टॅक्स आणि नियमांचा बळी पडत असल्याचं बजाज यांचं वक्तव्य.

बजाज ऑटो सध्या सीएनजीवर चालणाऱ्या बाइकची निर्मिती करण्याच्या तयारीत आहे. कंपनी ही बाईक २०२५ मध्ये लाँच करू शकते अशी माहिती कंपनीचे सीईओ राजीव बजाज यांनी एका मुलाखतीदरम्यान दिली. सध्या सीएनजीवर चालणाऱ्या बाईक्स जगात कुठेही तयार केल्या जात नाहीत, असं म्हणत टू व्हिलर इंडस्ट्री गरजेपेक्षा अधिक टॅक्स आणि नियमांचा बळी पडत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.  "थ्री व्हिलर इंडस्ट्रीतील जवळपास ६० टक्के हिस्सा सीएनजीकडे वळला आहे. वाहन विक्रीची विक्रीची गती अद्याप कोरोना महासाथीच्या पूर्वीच्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही," असं बजाज म्हणाले.  CNBC-TV18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. "अलीकडे टू व्हिलर सेगमेंटवर खूप प्रभाव दिसून आला आहे. कंपनीचे दर महिन्याला १० हजार युनिट्सच्या विक्रीचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पादन जवळपास दुप्पट होण्याची अपेक्षा आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.परवडणारे पर्याय"आमच्या बाईक ट्रायम्फसह आम्ही ग्राहकांना परवडणारे पर्याय उपलब्ध करून देत आहोत. जबरदस्त व्हॅल्यू असलेली आम्ही प्रीमियम उत्पादनं ऑफर करत आहोत. ट्रायम्फसाठी पुण्यातील चाकण येथे एक नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्यात आला आहे. यावर ज्यावर २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत,' अशी माहिती यापूर्वी एका मुलाखतीत बजाज यांनी दिली होती.

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइलबाईक