Abha Health ID Card And Ayushman Card : दिवसेंदिवस वैद्यकीय उपचार महाग होत चालले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने २ योजना सुरू केल्या आहेत. आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड. पण, या दोन्हींमध्ये अनेक लोकांचा गोंधळ होतो. अनेक नागरिकांना हे दोन्ही एकच वाटत असले तरी, त्यांचे उद्देश आणि फायदे पूर्णपणे वेगळे आहेत.
आयुष्मान कार्डआयुष्मान कार्ड, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड देखील म्हणतात. केंद्र सरकारने ही योजना २०१८ मध्ये आणली. याचा मुख्य उद्देश देशातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्गाला परवडणाऱ्या आरोग्य सेवा आणि वित्तीय सुरक्षा देणे आहे. हे कार्ड केवळ आर्थिक दृष्ट्या कमकुवत आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी आहे. या कार्डधारकांना कुटुंबातील सदस्यसंख्या कितीही असली तरी, दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सेवांचा विमा आणि वित्तीय संरक्षण मिळते.देशभरातील सूचीबद्ध सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचारांची सुविधा मिळते. यात रुग्णालयात भरती होण्यापूर्वीचे ३ दिवस आणि भरतीनंतरचे १५ दिवसांचे खर्च समाविष्ट असतात. विशेष म्हणजे, यात पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांचाही समावेश होतो.
आभा कार्ड आभा कार्ड हे डिजिटल हेल्थ अकाउंट कार्ड आहे, जे सरकारने २०२१ मध्ये सुरू केले. याचा मुख्य उद्देश आर्थिक मदत करणे नसून, देशातील सर्व नागरिकांना एक युनिक डिजिटल हेल्थ आयडी आणि 'हेल्थ डोझियर नंबर' प्रदान करणे आहे. हे कार्ड देशातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध आहे. कोणीही याचा लाभ घेऊ शकतो. हे कार्ड एका डिजिटल हेल्थ अकाउंटप्रमाणे काम करते. या १४ अंकी डिजिटल हेल्थ आयडीमध्ये व्यक्तीच्या संपूर्ण वैद्यकीय इतिहासाची आणि आरोग्याच्या नोंदींची माहिती सुरक्षित असते. हे कार्ड आरोग्य सेवा पुरवठादारांना उपचारादरम्यान रिअल टाइम हेल्थ डेटा उपलब्ध करून देते. यामुळे डॉक्टरांना पुराव्यावर आधारित अचूक उपचार करणे शक्य होते.
वाचा - डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
दोघांमधील महत्त्वाचा फरकआयुष्मान कार्ड हे विमा संरक्षण कार्ड आहे, जे तुम्हाला आर्थिक मदत (₹५ लाख) देते. याउलट, आभा कार्ड हे केवळ तुमचे डिजिटल ओळखपत्र आणि वैद्यकीय नोंदी व्यवस्थापित करणारे साधन आहे. आभा कार्ड मिळाल्यानंतरही कोणताही व्यक्ती आयुष्मान भारत योजनेचा सदस्य (पात्र असल्यास) बनू शकतो. पण आभा कार्ड मिळाले, याचा अर्थ तुम्हाला आयुष्मान कार्डचे (₹५ लाखांचे) आर्थिक लाभ मिळतील असा नाही.
Web Summary : Ayushman Card provides financial health coverage up to ₹5 lakh for the economically weaker. Abha Card is a digital health ID for all citizens, storing medical records for efficient healthcare access. They serve distinct purposes.
Web Summary : आयुष्मान कार्ड आर्थिक रूप से कमजोर लोगों के लिए ₹5 लाख तक का वित्तीय स्वास्थ्य कवरेज प्रदान करता है। आभा कार्ड सभी नागरिकों के लिए एक डिजिटल स्वास्थ्य आईडी है, जो कुशल स्वास्थ्य सेवा पहुंच के लिए चिकित्सा रिकॉर्ड संग्रहीत करता है। दोनों के अलग-अलग उद्देश्य हैं।