Join us  

खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 2:46 PM

Axis Bank revises fixed deposit interest rates : अ‍ॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे.

ठळक मुद्देअ‍ॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या विविध कालावधीसाठी एफडी (FD) ऑफर करते.

खासगी क्षेत्रातील 'या' मोठ्या बँकेने FD वरील व्याजदारात केले बदल, जाणून घ्या नवे दर...नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या अ‍ॅक्सिस बँकेने (Axis Bank) फिक्स्ड डिपॉझिटवरील (Fixed Deposit) व्याज दरात बदल केले आहेत. नवीन दर 18 मार्च 2021 पासून लागू झाले आहे. अ‍ॅक्सिस बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या विविध कालावधीसाठी एफडी (FD) ऑफर करते. (Axis Bank revises fixed deposit interest rates. check FD rates here)

या नवीन बदलानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून 7 दिवस ते 29 दिवसांदरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 2.50 टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच, 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3 टक्के व्याजदर आणि 3 महिने ते 6 महिन्यात मॅच्युअर होण्याऱ्या एफडीवर 3.5 टक्के व्याज आहे.

सहा महिने ते 11 महिन्यात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज अ‍ॅक्सिस बँक देत आहे. तर 11 महिने 25 दिवस ते 1 वर्ष 5 दिवसांच्या एफडीवरील व्याज दर 5.15 टक्के आणि 1 वर्ष 5 दिवसापासून 18 महिन्यांपेक्षा कमी एफडीचा व्याज दर 5.10 टक्के आहे. 

याचबरोबर, अ‍ॅक्सिस बँक 18 महिने ते 2 वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 5.25 टक्के व्याज देत आहे. अ‍ॅक्सिस बँक 2 वर्ष ते 5 वर्षाच्या दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 5.40% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 5.75% व्याज ऑफर करत आहे.

(BOI च्या ग्राहकांना अलर्ट! 21 एप्रिलपासून बंद होणार 'ही' सेवा, वाचा बँकेनं काय म्हटलंय?)

अ‍ॅक्सिस बँकेचे लेटेस्ट एफडी व्याज दर...- 7 दिवस ते 14 दिवस – 2.50%-  15 दिवस ते 29 दिवस – 2.50%-  30 दिवस ते 45 दिवस – 3%-  46 दिवस ते 60 दिवस – 3%- 61 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी – 3%- 3 महिने ते 4 महिन्यांपेक्षा कमी – 3.5%-  4 महिने ते 5 महिन्यांपेक्षा – 3.5% कमी- 5 महिने ते 6 महिन्यांपेक्षा कमी – 3.5%- 6 महिने ते 7 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%- 7 महिने ते 8 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%- 8 महिने ते 9 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%- 9 महिने ते 10 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%- 10 महिने ते 11 महिन्यांपेक्षा कमी – 4.40%- 11 महिने ते 11 महिने 25 दिवसांपेक्षा कमी – 4.40%- 11 महिने 25 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 5.15%- 1 वर्ष ते 1 वर्ष 5 दिवसांपेक्षा कमी – 5.15%- 1 वर्ष 5 दिवस ते 1 वर्ष 11 दिवसांपेक्षा कमी – 5.10%- 1 वर्ष 11 दिवस ते 1 वर्ष 25 दिवसांपेक्षा कमी – 5.10%-1 वर्ष 25 दिवस ते 13 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%- 13 महिने ते 14 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%-14 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%- 15 महिने ते 16 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%- 16 महिने ते 17 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%- 17 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी – 5.10%- 18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.25%-2 वर्षे ते 30 महिन्यांपेक्षा कमी – 5.40%-30 महिने ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.40%- 3 वर्ष ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.40%- 5 वर्ष ते 10 वर्ष – 5.75%

ज्येष्ठ नागरिकांसाठीचे एफडी दरअ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) ज्येष्ठ नागरिकांना निवडक मॅच्युरिटीवर जास्त व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षे मुदतीच्या ठेवींवर 2.5 ते 6.5 टक्क्यांपर्यंतचे व्याज मिळेल.

(गुंतवणूकदारांना कमाई करण्याची मोठी संधी, लवकरच Zomato कंपनी आणणार IPO; वाचा सविस्तर)

दरम्यान, यावर्षी जानेवारीमध्ये अ‍ॅक्सिस बँकेने 15 डिसेंबर 2020 किंवा त्यानंतर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बुक केलेल्या नवीन किरकोळ मुदत ठेवी मुदतीपूर्वी बंद केल्याबद्दलाच दंड न आकारण्याची घोषणा केली. रिटेल ग्राहकांना लिक्विडिटीच्या अचानक गरजांची चिंता न करता दीर्घकालीन बचतीसाठी प्रोत्साहित करणे हा त्याचा हेतू आहे. ही सवलत नवीन एफडी (FD) आणि आरडीमध्ये (RD) उपलब्ध असणार आहे. 

टॅग्स :बँकव्यवसायपैसा